अंक – आनंद, मे १९३७ एक होता गरीब ब्राह्मण. त्याला वाटले की, आपण सगळ्यांत श्रेष्ठ व्हावे. म्हणून त्याने देवाची खूप प्रार्थना केली. त्याच्या प्रार्थनेमुळे देव त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याने त्यास दर्शन दिले. देवाने “वर माग” असें म्हणताच “मला सगळ्यांत श्रेष्ठ कर!” असा ब्राह्मणाने वर मागितला. देवाने विचारले, “मी तुला कोणाइतके श्रेष्ठ करूं?” ब्राह्मणाला विचार पडला. त्याने देवाजवळून सात दिवसांची मुदत मागून घेतली व “सगळ्यांत श्रेष्ठ कोण?” ह्याचा तपास करण्याकरितां तो प्रवासास निघाला. प्रथमच त्यास एक सावकार भेटला. त्याचा तो थाटमाट वगैरे पाहून ब्राह्मणास वाटलें की, “सावकारच सगळ्यांत श्रेष्ठ. आपणही सावकारच व्हावे.” पण इतक्यांत राजाचे नोकर आले व त्यांनी सावकारास पकडून राजाकडे नेले. राजाने सावकारास राजद्रोहाच्या आरोपावरून ठार केले. ब्राह्मणास वाटले की, “राजाच सगळ्यांत श्रेष्ठ आहे.” म्हणून तो ब्राह्मण “मला राजा कर” असा वर मागण्याकरितां देवाकडे जाणार, इतक्यांत त्या राजाची राणी पाय आपटीत आपटीत राजाकडे आली व त्या राजास वाटेल तसे बोलूं लागली. ब्राह्मणाला वाटले, “राणीच राजापेक्षा श्रेष्ठ.” इतक्यांत एक दासी एक गुलाबाचे फूल घेऊन आली. त्याबरोबर राणीचा राग कोठच्या कोठेच पळाला. राणी खुदकन् हंसली व तिने ते फूल डोक्यांत खोवले. ब्राह्मणाला वाटले, “फूलच सगळ्यांत श्रेष्ठ. कारण ते राणीच्या डोक्यावरही बसण्यास कमी करीत नाही.” तो असा विचार करतो न करतो तोंच एक फूलपांखरूं त्या गुलाबावर जाऊन बसले व आंतील मध पिऊन उडून गेले. त्यामुळे गुलाब निस्तेज झाला. ब्राह्मण विचार करूं लागला, “किती आनंदी आहे हे फूलपांखरूं! आपण फूलपांखरूंच व्हावे.” परंतु लगेच त्यास फूलपांखरूं होण्याचा व ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
कथा
, आनंद
, बालसाहित्य
Rdesai
6 वर्षांपूर्वीलेख छान आहे.आपल्या लेखातुन मानवीस्वभावाचे दर्शन घडते