कवी स्वतःमध्येच हरवलेला असतो. कवीला स्वतःच्या कवितेपलिकडे काहीच दिसत नाही, असं सर्रास म्हटलं जातं. अरूण म्हात्रे हा कवी याला अपवाद आहे. अरुण म्हात्रेंना नव्या-जुन्या कवींच्या शेकडो कविता पाठ आहेत. त्यातली सौंदर्यस्थळं सांगताना ते एखाद्यानं स्वतःच्या कवितेविषयी बोलावं तेवढ्याच आत्मियतेने बोलतात. अशा या कवीच्या कविताही तेवढ्याच बोलक्या आहेत, वेगळेपण घेऊन आलेल्या आहेत आणि शब्द-प्रतिमांचा एक निराळाच खेळ त्या खेळतात. याचा प्रत्यय देणारा अरुण म्हात्रे यांच्या कवितांचा पोत तपासणारा हा रसास्वाद, अंतर्नादच्या मे २०१० च्या अंकातून- ********** अंक- अंतर्नाद, मे २०१० कविताभर विबासची बेमुर्वत ओढ व्यक्त करणारे म्हात्रे शेवटच्या ओळीत त्याची परिणती संसाराची राखरांगोळी होण्यात होऊ शकते हे सांगतात. सिगरेटच्या पानभर जाहिरातीच्या तळाशी दिलेला वैधानिक इशाराच! अरुण म्हात्र्यांचा पहिला कवितासंग्रह होता ‘ऋतु शहरातले’. त्यातल्या पहिल्या कवितेच्या पहिल्या ओळी आहेत : खिडकीतून हाका मारणारं आकाशाचं मांजर एकच असतं नेहमी. आपण वेळेच्या बशीत दूध होऊन तरंगतो लपलप. (च्युइंगम) खिडकीतल्या आकाशाच्या एकमेवाव्दितीय मांजराकडून चाटले जाण्याची आपण वाट पाहतो आहोत न आहोत, तोच म्हात्रे आपल्या अंगावर प्रहरांचे प्रहार करून आपलेच मांजर करून टाकतात. सगळ्या प्रहरांचे प्रहार खिडकीच्या गजांना धरून मोजतो आणि डोळे मिटून चाटीत राहतो आपलं सनातन ठणकतं अंग. अशा मनाला येईल त्या कल्पनांचे पतंग अरुण म्हात्र्यांची कविता उडवीत असते. या भरकटणाऱ्या पतंगांना आवरण्याचा प्रयत्न हा कवी अजिबात करीत नाही. किंबहुना अशा भन्नाट कल्पना हा त्यांच्या कवितांचा स्थायिभाव झाला आह ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
MADHAVIMD
5 वर्षांपूर्वीत्यांच्या कविता प्रत्यक्ष त्यांच्या कडून एकल्यात,लाजवाब
shriramclinic
6 वर्षांपूर्वीप्रचंड ताकद आहे या कवितेची