बालगंधर्वांची अखेर

पुनश्च    वसंत वैद्य    2017-10-07 07:10:30   

अंक - विचित्रविश्व जुलै १९८५ १४/१५ वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना! त्या दिवशी नेमका मी पुण्यात होतो. दुपारची जेवणवेळ. मी नारायण गेटजवळच्या माझ्या घरून पान खाण्यासाठी बाहेर आलो होतो. गेटजवळच्या पानाच्या दुकानाकडे वळणार इतक्यात माझ्या अगदी समोर चार-सहा फुटांच्या अंतरावर एक प्रेतयात्रा येताना दिसली. मी त्वरेने मागे धावलो. रस्त्याच्या कडेला उभे राहून बघू लागलो, तो त्या प्रेतयात्रेत मोजकीच माणसे सामील झालेली! चौघांनी प्रेताची ताटी खांद्यावर घेतलेली, एकजण पुढे विस्तव धरलेला आणि बाकीची शेलकीच माणसे भरधाव वेगात जात असलेली. ती जवळजवळ सर्वच माणसे परिचित चेहर्‍यांची. पुण्याच्या नाट्यक्षेत्रात प्रत्यही दिसत असलेली. नाट्यक्षेत्रातील सभा-संमेलनात माझे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यावेळी तेथे दिसणारी प्रमुख माणसे त्या प्रेतयात्रेत दिसली. मी तशा स्थितीतही शेवटून जाणाऱ्या एका परिचितांना हळूच विचारून घेतले. ‘कोण?’ न थांबता त्यांनी कुजबुजत्या स्वरात सांगितले.. ‘अहो... गंधर्व... बालगंधर्व...’ बालगंधर्वाची प्रेतयात्रा अणि ती अवघ्या इतक्या थोड्या माणसांच्या उपस्थितीत! बालगंधर्व...सौभद्र...स्वयंवर...मृच्छकटिक...एकच प्याला...जोहार मायबाप जोहार...अन्नदाते मायबाप हो.. हे सारे क्षणात डोळ्यांपुढे उभे राहिले. पान खाण्याची इच्छा पार मावळून गेली. ओंकारेश्वराच्या समोरील नदीच्या किनाऱ्यावरल्या बंदिस्त आवारात प्रेत खाली ठेवण्यात आले. कुणीतरी त्वरेने पुढे झाले. लाकडे रचण्यात आली. प्रेत नदीच्या पाण्यात भिजवून आणले. प्रेताचा गोरापान चेहरा तशा अचेतन अवस्थेतही देखणा दिसत होत. प्रेत ठेवल्य

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विचित्रविश्व , व्यक्ती विशेष , मृत्यूलेख , कला जगत
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1.   5 वर्षांपूर्वी

    बालगंधर्व चित्रपटात तर हे नाते फारच वाईट रंगवले आहे त्यामुळे या बाईंच्याबद्दल सध्याच्या पिढीला तेच खरे वाटणारं पण अभ्यासू वाचकांना विनंती की त्यांनी वास्तव समोर आणावं.

  2. satishk

      5 वर्षांपूर्वी

    यातील गोहरजानचा दाखवलेला फोटो हा बालगंधर्वांच्या गोहरजानचा नाही. या वेगळ्यीया गायीका गोहरजान आहेत या यांची रेकाँर्ड पण उपलब्ध आहे. गंधर्वांच्या काही लेखात गोहरजानला वाईट पण ठरवले आहे. अनेकांनी बालगंधर्वाबाबत लिहले आहे.प्रत्येकाला चिमुटभर सापडले आहेत

  3. Shrikant Arvind Athavale

      6 वर्षांपूर्वी

    खूप माहितीपुर्ण लेख

  4. Rajrashmi

      6 वर्षांपूर्वी

    डोळ्यात पाणी आले, समाज्याला बराच देणा-याने समाजातील बांधीलकी जपावयास हवे,जाताजाता गंधर्व शिकवून गेले

  5. asmitaph

      6 वर्षांपूर्वी

    So tragic ! Thanks for the article.

  6. ulhas

      6 वर्षांपूर्वी

    विकलांग राजहंसाच्या दर्शनाचा योग सन१९६२/६३मधे आला होता. माझा वर्गमित्र बाळ परांजपे याच्या चिंचेची तालिम येथील वाड्यात बालगंधर्व मुक्कामाला होते. आजारी होते. तेव्हा परांजपे कुटुंब त्यांची सेवा सुश्रुशा करताना बघितले आहे. परांजपेसर (स.प.काँलेजात घा-या परांजपे नावाने ओळखले जात) गंधर्वांना आंघोळ घालण्यापासून इतर विधींसाठी जातीने खपत असत.मतलबी ,नाटकी सज्जन ह्या सरसकट विधानाच्या पार्श्वभुमीवर अशाही अपवादात्मक रसिकांची दखल घेणे अगत्याचे वाटते . मकरंद यांंनी लिहील्या प्रमाणे अंत्यविधी झटपट उरकण्याचे कारण बरोबर वाटते. पुण्यात अंत्यसंस्कारा वरुन गाजलेली प्रकरणे आहेत. ज्ञान कोशकार केतकर, कमला दास.

  7. asiatic

      6 वर्षांपूर्वी

    छान लेख . जुने लेख वाचताना मजा येते.

  8. subkem

      6 वर्षांपूर्वी

    >> 14/15 वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना! << अशी ह्या लेखाची सुरवात आहे. त्यामुळे, ' विचित्रविश्व जुलै १९८५ ' हा पूर्वप्रसिद्धीबाबतचा संदर्भ लेखाच्या आधी दिलेला असणे अधिक सोईचे असेल.

  9. rahulwagh

      6 वर्षांपूर्वी

    very touching akkha aayushya ekhadya Rajachya rubabat jaglelya hya awaliyacha anta evadha dayaniya so sad

  10. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    मला प्रश्न नाही कळला. सविस्तर लिहाल तर बरं होईल.

  11. अशोक मधुकरराव पंडित जालना

      6 वर्षांपूर्वी

    पूर्ण लेख का वाचवा ते सांगा

  12. prabhasalwekar

      6 वर्षांपूर्वी

    थोडा अभ्यास करून गोहरबाईंचे आत्मनिवेदन लिहिता येईल

  13. Nishikant

      6 वर्षांपूर्वी

    दुर्दैवाचे दशावतार !

  14. Anil95

      6 वर्षांपूर्वी

    अतीशय दुर्मीळ माहीती .दु:खद शेवट .अशी असामी पून्हा होणे नाही .

  15. vhatewar

      7 वर्षांपूर्वी

    मुसलमान हा धर्म नव्हे , एखाद्या व्यक्ति जेव्हा इस्लाम हा पंथ स्वीकारतो तेव्हा तो मुसलमान होता . बाकी लेख छान आहे .

  16. DRANIL

      7 वर्षांपूर्वी

    Speechless!!

  17. ashokacharekar

      7 वर्षांपूर्वी

    touching.....

  18. harshal424

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय वेदनादायक! विशेषकरून धर्मांतरण हा मुद्दा. :-(

  19. dilip kharwadkar

      7 वर्षांपूर्वी

    verygood

  20. pradnyakulkarni

      7 वर्षांपूर्वी

    कलाक्षेत्रातील बऱ्याच जणांना हा शाप असतोच असे वाटते ??

  21. मकरंद करंदीकर

      7 वर्षांपूर्वी

    एक गोष्ट आपल्या नजरेला आणू इच्छितो. या बद्दल कांही पुरावा नसला तरी असे म्हणतात की मृत्युपूर्वी बाल गंधर्वांनी गोहरजान यांच्याशी लग्न केले होते आणि त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. आयुष्यभर हिंदू म्हणून जगलेल्या या नटसम्राटाने शेवटच्या दिवसात तडजोड म्हणून जर धर्मांतर केले असेल तर त्याच्या अंतिम संस्कारामध्ये धार्मिक विघ्न उभे राहू नये, बखेडा होऊ नये म्हणून बालगंधर्वांचा अंत्यविधी घाईघाईने उरकला गेला असावा.

  22. neelampra

      7 वर्षांपूर्वी

    badly , nahi .

  23. Amar Pethe

      7 वर्षांपूर्वी

    छान माहिती मिळाली आणि मन खिन्न झाले. पुनश्च ला धन्यवाद

  24. kiran bhide

      7 वर्षांपूर्वी

    वा!! त्या कार्यक्रमाची चित्रफित बनवली आहे का?

  25. neelampra

      7 वर्षांपूर्वी

    बालगंधर्वांच्या प्रसिद्ध नाटकांवर आधारित एक ३ तासांचा कार्यक्रम सौ नीलम प्रदीप जोशी यांनी अपार मेहनत घेवून मालवण येथे साकारला होता .त्या कार्यक्रमाची तयारी आमच्या घरात सुरु असताना मला बालगंधर्व हे व्यक्तिमत्व ०.५ % समजले होते , पण त्यांचा शेवट असा झाला हे ह्या लेखामुळेच समजले !! प्रदीप जोशी

  26. mugdhabhide

      7 वर्षांपूर्वी

    man vishanna karanare anubhav kathan



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen