भूक

पुनश्च    अज्ञात    2017-09-25 17:05:39   

माझ्या सोसायटीत पार्कींगमधे एक मुलगी येऊन बसते. अंगावर शाळेतला गणवेश, भाषा परभणीकडची, अनवाणी पायाने चालणारी ! तिला विचारले "काय करतेस तू ? ती म्हटली इयत्ता दुसरीत आहे .. म. न. पा.च्या मराठी शाळेत ! मग म्हटलं"तू शाळा सुटल्यावर रोज इथे काय करतेस ? तर ती म्हणाली, 'आई वडिलांची वाट पाहातेय ! मी- "काय करतात आईवडील.. ? ती- "मोठ मोठ्या बिल्डिंगा बनवतात ! तेव्हा मी ओळखले की हिचे आईवडील बिगारी आहेत. संध्याकाळी ते आईबाप आले तिला घेऊन गेले..!दुसऱ्या दिवशी तोच सीन.... बरेच दिवस मी त्या मुलीशी बोलतोय.... तिच्या बोलण्यातून एकच समजलय मला ....की तिच्या मते शाळा शिकल्यावर .आपले आईवडील जे बिल्डिंगा बांधतात ना ,तश्या बांधाव्या नाही लागणार.!!!....तर त्यात राहणाऱ्या माणसांसारखेच आपणही त्यात राहायला जाऊ ... ओह... !!! केवढा आशावाद।।।।।। तिच्याकडे शाळेत पाणी न्यायला बाटली नव्हती म्हणून तिला एक बाटली दिली .... एक चप्पल जोड दिला .. फार आनंद झाला तिला . परवा ती मला रडताना दिसली...मी म्हटलं "काय झाले ग लक्ष्मी ? ती म्हणाली "तुम्ही दिलेली बाटली हरवली गेली..... मी म्हटले "अग मग त्यात रडायचं कशाला ? दुसरी देतो तुला ! ती थोडी सुखावली ...तिला पुन्हा एक बाटली दिली..!! तिने मुकाट्याने घेतली अन पुस्तकांच्या पिशवीत घातली..!!! आज ती पुन्हा आली माझ्याकडे , म्हटले " आता काय झाले ? तर ती म्हणाली "काही नाही ,बाटली द्यायला आलेय..!!! मी म्हटले का ग ? काय झाले ? तर ती म्हटली "माझी पहिली बाटली सापडली....!!! तेव्हा आई म्हनली ही देऊन टाक माघारी ...!! मी म्हटले "राहुदे गं... पहिली खराब झाली की येईल तुला उपयोगाला !!! पण तिला नाही समजले माझे बोलणे.....बाटली माघारी दिलीच. माझे डोळे नकळत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अवांतर , पालकत्व , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. shripad

      5 वर्षांपूर्वी

    गरीबीतील निरागसता अमूल्य असते.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen