अंक: चतुरंग पुरवणी, ३० जुलै शनिवार लोकसत्ता २००५
एक ऑगस्टला सर्वत्र लोकमान्यांचे पुण्यस्मरण होईल व ते झालेच पाहिजे; पण त्याचबरोबर सत्यभामाबाईंसंबंधी आपण कृतज्ञ असले पाहिजे.' असे या लेखात लेखक म्हणतो, या सत्यभामाबाई म्हणजे लोकमान्यांच्या पत्नी. पत्नी या नात्याने वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी टिळकांना दिलेली साथ अत्यंत मोलाची होती. त्यांच्यासंबंधी विविध ग्रंथांमध्ये, विविध व्यक्तींच्या आठवणींमध्ये जी माहिती प्रसिद्ध झाली तिचे संकलन करुन सत्यभामाबाईंच्या आयुष्याचा आणि टिळकांसोबतच्या संसाराचा रेखाटलेला हा पट वाचून आपण भारावून जातो. पुनश्र्चच्या व्यक्तिमत्वविशेष मालिकेतील हा एक अत्यंत मोलाचा ऐवज. लेखक विकास परांजपे हे लोकमान्य टिळकांचे भक्त आणि अभ्यासक असून ते प्रकाशक आहेत.
**********
इतिहासावर आपला ठसा उमटिवणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. लोकमान्य टिळक त्यापैकीच एक. दुसरे-टिळकांचे समकालीन गोपाळ गणेश आगरकर. आगरकारांच्या पत्नी यशोदाबाई यांनी आपल्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई लिहिता येण्याएवढ्या शिकलेल्या नव्हत्या. टिळकांच्या मृत्यूनंतर स. वि. बापट यांनी ‘आठवणी आणि आख्यायिका’ हे टिळकांच्या आठवणींचे तीन खंड प्रसिद्ध केले आहेत. त्यात टिळकांची मुले श्रीधर व रामचंद्र आणि नातू ग. वि. केतकर यांनी सत्यभामाबाईंसंबंधी काही आठवणी सांगितल्या आहेत. इतरत्रही त्यांच्या आठवणी विखुरलेल्या आहेत. ऑगस्ट १९४५ च्या ‘सह्याद्री’ मासिकाच्या टिळक विशेषांकात टिळकांच्या दोन कन्या पार्वतीबाई केतकर आणि मथुताई साने यांनी आपल्या आईसंबंधी लिहिलेला लेख या सत्यभामाबाईंसंबंधी महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. १८७१ साली वयाच्या दहाव्या वर्षी सत्यभामाबाईंचे टिळकांशी लग्न झाले. टिळक तेव्हा १५ वर्षांचे होते. त्यांच
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, लोकसत्ता
, स्त्री विशेष
, व्यक्ती विशेष
व्यक्ती विशेष
विकास परांजपे
6 वर्षांपूर्वीतुमच्या म्हणण्याचा अर्थ कळला नाही
ACKOOL
6 वर्षांपूर्वीमूठभर इंग्रजांनी एवढे जुलूम करूनही हिंदुस्थानला जखडून ठेवले ते नेमके कोणाच्या सहकार्याने हे आता गुप्त राहिले नाही !!