भारतात, बौद्ध धर्माचा झालेला उदय, विकास व ऱ्हास आणि भारताबाहेर झालेला त्याचा प्रसार हा इतिहास अतिशय रंजक व अभ्यसनीय आहे. बौद्ध धर्माच्या इतिहासाप्रमाणे बौद्ध धर्माच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे होत गेली. प्रारंभी बौद्ध धर्माचा प्रसार चारित्र्यवान बौद्ध भिक्षू व भिक्षुणींनी घडवून आणला परंतु कालांतराने बौद्ध विहारांमध्ये ध्येयवाद, शिस्त यांची जागा अनेक दुर्गुणांनी घेतली, परिणामत: बौद्ध धर्माच्या अध:पतनास सुरुवात झाली. संख्यावृद्धीच्या लोभाचा या ऱ्हासास कसा हातभार लागला याचे विवेचन करणारा हा लेख, बौद्धसम्प्रदायाचा विनाश कसा झाला ते सांगोपांग विषद करणाऱ्या दीर्घा लेखमालिकेतील तिसरा लेख आहे. प्रा. श्री.भा. वर्णेकर यांचा हा लेख मुळात 'पुरुषार्थ'च्या ऑगस्ट १९५५ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. ********** (अंकः पुरुषार्थ, ऑगस्ट १९५५) संख्यावृद्धीच्या लोभास बळी पडल्यामुळे एखाद्या महान् सम्प्रदायाचा कसा विचका होतो, त्याची अन्तःशक्ती कशी नष्ट होते, याचे उत्कृष्ट निदर्शन बौद्धधर्माच्या विनाशांत पहावयास सापडते. बौद्धांच्या अंतर्गत पंथोपंथामुळे बौद्धसम्प्रदाय खिळखिळा होऊ लागला होता. या सम्प्रदायांनी निरनिराळ्या प्रकारचे आचार समाजात प्रवर्तित केले. समाजाला थोड्या परिश्रमात जास्तीत जास्त सुखप्राप्तीचा मार्ग जो सांगेल त्याचा सम्प्रदाय भराभरा फोफावू लागतो. निवडणुकीच्या दिवसात निरनिराळ्या राजकीय पक्षोपपक्षांचे लोक मतपत्रिका मिळविण्यासाठी जशी प्रलोभने अशिक्षित समाजाला दाखवितात तशीच प्रलोभने स्वतःच्या धार्मिक सम्प्रदायाचा अडाणी समाजात प्रचार वाढविण्याचा प्रयत्न करणारे लोक दाखवित असतात. सर्व पापांचे मूळ म्हणजे लोभ (लोभमूलानि पापानि) व पापांचे निर्मूलन ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
psirane
6 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण लेख
ugaonkar
6 वर्षांपूर्वीयातले खरे काय आणि खोटे काय हे कळणे कठीण आहे. कारण बौद्ध लोकांचा अजूनही समाज आहे कि शंकराचार्यांनी बौध् धर्मास भारताबाहेर काढले !