अंक – किर्लोस्कर, जुलै १९६३ महाविद्यालयीन जीवनाचा काळ हा जीवनांतील एक अत्यंत विलोभनीय काळ असतो. जीवनांत काही गोष्टी अशा असतात की त्यांची स्मृती नेहमी उत्कटच राहते. पहिली मैत्री, पहिली प्रीती, ध्येयवादाचे पहिले आकर्षण, व्यावसायिक जीवनांतील पहिले पदार्पण या अशाच कांही गोष्टी आहेत. या गोष्टींचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला सामान्यपणे ज्या वयांत येतो ते वयही महाविद्यालयीन जीवनाच्या कालखंडाचेंच असते. या कालखंडाची आठवण याचमुळे जीवनांत पुढे कधी पुसली जात नाही. उत्सुकता, उत्साह, खेळकरपणा, बंधनाच्या पलीकडे जाण्याची वृत्ती, आपल्या भविष्यकालाविषयी कांहीशी साशंकत, नेत्रदीपक असे आपल्या हातून कांही घडावें ही ईर्ष्या, तसे घडेल अशी आशा, अननुभूत भावजीवनाची पहिली ओळख, एक अकारण हुरहूर अशा अनेकविध रंगांचे इंद्रधनुष्य या कालखंडावर आपली मनोहर कमान टाकून उभे असते! या काळांतील जीवन एक चैतन्यशाली ऊनपावसाचा खेळ असतो. याच इंद्रधनुष्याचे इंद्रवज्रात रूपांतर करणे हे महाविद्यालयीन शिक्षणाचे खरें कार्य आहे! या काळांतील सुखदुःखे ही कांहीशी आभासमय असली तरी जीवनावर संस्कार करण्याच्या दृष्टीने अतीव परिणामकारक असतात. युवकांचे शील याच काळांत घडत असते आणि या शीलाच्या आधारानेच राष्ट्रे उभी राहात असतात. विद्यापीठ हे राष्ट्राचे सर्वांत मोठे शक्तिकेंद्र आहे. अणुशक्ती केंद्रपेक्षाही या केंद्राचे महत्त्व अधिक आहे. हे शक्तिकेंद्र कार्यक्षम असेल तर राष्ट्र कितीही मोठे आघात पचवून पुन्हा उभे राहूं शकेल. याउलट हे केंद्रच कमजोर झाले तर अत्यंत समृद्ध राष्ट्रही कालांतराने धुळीला मिळाल्याखेरीज राहणार नाही. या विधानांत अतिशयोक्ती नाही तर केवळ वस्तुस्थितीचे निदर्शन आहे. विद्यापीठांचे व पर्यायान ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
चिंतन
, शिक्षण
, किर्लोस्कर
bookworm
6 वर्षांपूर्वीकॉलेज कुमारान्साठी अत्यंत सुयोग्य मार्गदर्शन!
ugaonkar
6 वर्षांपूर्वीफरक
ugaonkar
6 वर्षांपूर्वीअजूनही हेच हवंय ! ५२ वर्षात पार्क नाही पुन्हा पुन्हा हेच सांगितले पाहिजे.