पु. भा. भावे (१२ एप्रिल १९१०- १३ ऑगस्ट १९८०) हे कथा-कादंबरीकार म्हणून जास्त परिचित आहेत आणि त्यांच्या जहाल राजकीय लेखांमुळे त्यांच्या लेखकीय व्यक्तिमत्वातील इतर पैलुंकडे थोडे दुर्लक्षच झाले. त्यातील एक महत्त्वाचा पैलू आहे विनोदी लेखनाचा. भाव्यांनी विपुल स्फुटलेखन केले आहे, त्यातील अनेक लेख हलके-फुलके, तिरकस, व्यंगात्म शैलीत लिहिलेले होते. मुळात नागपूर हे मध्यप्रदेशाला लागून असल्याने हिंदी मातीतील व्यंगात्मक लिखाणाचे बीज वैदर्भीय लेखकांमध्येही रुजल्याचे अनेकदा दिसून येते. भाव्यांचा जन्म, शिक्षण, जडण-घडण नागपुरातच झाली होती. ‘वाकुल्या (१९५२)’, ‘वायबार (१९६०)’ हे त्यांच्या अशा हलक्या फुलक्या लेखांचे संग्रह आहेत. प्रस्तुत लेख ‘विश्व वाणी’च्या १९३५ सालच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. आज ८५ वर्षांनीही नागपूरसह कोणत्याही शहरांत, गावात मच्छरांची पैदास होती तशीच आहे. स्वच्छतेची तीच ‘बोंब’आहे. त्यामुळे माणूस आणि मच्छर हे नातं कायम आहे. नागपुरात मच्छरांची प्रचंड पैदास झाल्याच्या बातम्या येत असतानाच्या पार्श्वभूमीवर भाव्यांनी तिरकस शैलीत आपली लेखणी चालवून माणूस आणि मच्छरांचे ‘रक्ताचे नाते’ मस्त रंगवले आहे. नागपूरी ‘मच्छर’ नंबर १ अंक - विश्र्व वाणी – एप्रिल १९३५ नट, खट व रेल्वे सर्व्हंट ह्यांच्याप्रमाणे रात्रपाळीवर भिस्त ठेवणारी नागपूरी मच्छरांची जमात आहे. आदितवारच्या प्रयोगासारखे भरदिवसाही आपले खेळ करायला हा प्राणी मागे घेत नाही. दिवसां दरोडे घालण्याची बेफाम प्रवृत्ती ह्यांच्यातही कधीमधी बळावते. पण असला प्रकार अपवादात्मकच. शुक्रवार तलाव हा नागपूरी मच्छरांचा बाप आहे. नागनदी ही मच्छरांची महामाता आहे. असल्या जोडप्याचे नाव चालवी
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
mukundmk
6 वर्षांपूर्वीखरंच भाषाप्रभुत्व जाणवते.