भारतीय राजेरजवाडे मातबर होते तरी किती?


एखाद्या विशिष्ट भूप्रदेशाचे नियंत्रण, कारभार आणि मालमत्ता ज्यांच्या हाती होत्या त्यांना संस्थानिक म्हणत. भारत हा अशा अनेक संस्थानांचा मिळून बनलेला देश होता. आकाराचा विचार करायचा झाल्यास ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भारताचा ४० टक्के भाग अशा संस्थानांनी व्यापलेला होता आणि देशातील २३ टक्के जनता या संस्थानांच्या अधिपत्याखाली होती. ब्रिटिशांनी राजकारण करताना या संस्थानिकांचा पुरेपूर उपयोग करुन घेतला. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर ही संस्थाने विलीन करण्यात आली हा इतिहास आपल्याला माहिती आहे. ही संस्थाने किती प्रचंड श्रीमंत होती, यांच्यापैकी कोणाकडे अधिक संपत्ती होती हा सर्वसामान्यांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय राहिलेला आहे. १९६७ साली अमृत या मासिकात प्रसिद्ध झालेला हा लेख कुतुहलाचे बऱ्यापैकी शमन करतो आणि मनोरंजनही करतो- अंक – अमृत, डिसेंबर, १९६७ भारतीय राजेमहाराजे यांना जे तनखे चालू आहेत व ज्या खास सवलती दिल्या जातात ते तनखे थांबवावेत व सवलती काढून घ्याव्यात असा आदेश भारतीय शासनाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिला आहे. त्यामुळे भारतातील राजेमहाराजांचे गाजलेले युग संपुष्टात येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. (कै.) सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही संख्येने पाचशेच्या आसपास असलेली संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करण्याची महान कामगिरी बजावलेली आहे. ती सर्वपरिचित असल्याने तिची पुनरावृत्ती येथे करीत नाही. भारतीय संस्थाने संघराज्यात विलीन झालीच पाहिजेत अशी सरदार वल्लभभाईंची कमीत कमी पण ठाम भूमिका होती. संस्थाने विलीन झाल्याने भारतात असंख्य ‘काश्मिर प्रश्न’ निर्माण होण्याचे टळेल असे त्यांना वाटत होते. संस्थानिकांची या कामी त्यांनी संमती मिळवली. आणि याचा मोबदला म्ह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , दीर्घा , अमृत

प्रतिक्रिया

 1. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  असे लेख अजून हवेत या साईटवर. भारतीय संस्थानांवर ‍लिहिले गेलेले पुष्कळ लेख ‍मिळतील.

 2. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  चान्गली माहिती. राजे रजवाडे हे सुस्त होते.सत्ता मर्यादित होती.विलीनीकरण नन्तर सत्ता राहिली नाही. प्रीवी पर्स रद्द करणे गैरकायदेशीर होते।सुप्रीम कोर्टात राजे जिन्कले .नन्तर नुकसान भरपाई देण्यात आली।

 3. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  सुंदर माहिती

 4. mhaskarmv

    2 वर्षांपूर्वी

  भारतीय इतिहासातील सुरस आणि रम्य कथा

 5. ghansham.kelkar

    2 वर्षांपूर्वी

  खुपच छान

 6. ajitpatankar

    2 वर्षांपूर्वी

  खूपच छान लेख. अनेक गोष्टी माहित नव्हत्या. “३२७ संस्थानांचा प्रदेश जेमतेम वीस चौरस मैलांचा होता. लोकसंख्या तीन हजार व कराचे उत्पन्न वार्षिक बावीस हजार होते. गुजरातेतल्या एका संस्थानात तर अवघा अर्धा चौरस मैलाचा प्रदेश होता व या प्रदेशातून संस्थानिकाला वार्षिक १६८ रुपये कराचे उत्पन्न मिळत होते.” हे वाचून गंमत वाटली...वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen