(अंक – किर्लोस्कर, मार्च १९४७) भारतात राज्य करण्यासाठी भारतीय लष्कराची आवश्यकता भासल्यावर इस्ट इंडिया कंपनीने कंपनीच्या अंतर्गत, कलकत्त्यामध्ये १७७६ साली मिलिटरी डिपार्टमेंट सुरु केले आणि त्यात भारतीयांची भरती सुरु केली. आज आपण भारतीय लष्कराचे जे सामर्थ्यवान स्वरुप पाहतो त्याचे मूळ या विभागात आहे. ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भारतीय लष्कराला दोन्ही महायुध्दांमध्ये ब्रिटिशांच्या बाजूने लढावे लागले. तेंव्हाच्या भारतीय सैनिकांची मनोवस्था कशी असेल याची आपण फार कल्पना करु शकत नाही आणि त्याबद्दल फार लिखाणही झालेले नाही. त्याचप्रमाणे एकुण लष्कराविषयीसुद्धा ‘देशभक्ती आणि कर्तव्य’ या भावनांच्या पलिकडे आपण विचार करत नाही. स्वातंत्र्यपूर्व भारतीय लष्करातले वातावरण आणि लष्कराकडे पाहण्याची एक वेगळी नजर देणारा हा लेख अगदी अनोखा आहे. नारायण पुराणिक हे स्वतःच १९४१ साली सैन्यात भरती झाले होते, त्या अनुभवावर आधारित हा लेख त्यांनी ‘किर्लोस्कर’च्या मार्च १९४७च्या अंकात लिहिला होता. माझें सैनिकी जीवन : एका महाराष्ट्रीय सैनिकाची जीवनकथा श्री. नारायण पुराणिक हे १९४१ सालांत हिंदी लष्करांत गेले. गेल्या पांच वर्षांत त्यांनी लष्करी जीवनाचे निरीक्षण केले. अनेक अनुभव घेतले. नुकतेच ते लष्करांतून मुक्त होऊन परत नागरिकांत आले आहेत. त्यांनी या लेखमालेत आपल्या लष्करी जीवनाचे मार्मिक विवेचन केले आहे. मी भरती झालो १० ऑक्टोबर १९४१ रोजी मी सैन्यांत नांव दाखल केले. “तुला कशासाठी सैन्यांत जावंसं वाटतं?” हा प्रश्न त्यावेळी माझ्या अनेक मित्रांनी आणि नातेवाइकांनी विचारला. मी एका स्पष्ट उद्देशाने सैन्यांत शिरत होतो; तो उद्देश ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, किर्लोस्कर
, दीर्घा
, अनुभव कथन
[email protected]
5 वर्षांपूर्वीकाळ आणि स्वीकारलेली नोकरी ,आजूबाजूची माणसे लक्षात घेता हे विचार आणि वागणूक खुप कौतुकास्पद आहे .लिहेलेही सुरॆख !
ghansham.kelkar
6 वर्षांपूर्वीसुंदर लेख