केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी भाषाच संपूर्ण देशाला एकत्र जोडू शकते अशा आशयाचं विधान केल्यावर भाषा आणि अस्मिता यांचा प्रश्न पुन्हा धगधगू लागला आहे. मुंबईत तर गेली अनेक वर्षे मराठी भाषा, मराठी संस्कृती हा भावनिक आणि त्यामुळे राजकीय प्रश्न झालेला आहे. शिवसेनेने मराठी अस्मितेवर स्वार होऊन सत्ता मिळवली आणि गेली तीन दशके मुंबई महापालिका ताब्यात असूनही मराठीच्या नावानं गळा काढण्याखेरिज काहीही केलेलं नाही. केवळ पोकळ घोषणाबाजी. ३५ वर्षांपूर्वी सेनेकडून किती अपेक्षा होत्या आणि माणूससारख्या साप्ताहिकालाही सेनेच्या मराठी प्रेमाचा उमाळा खरा वाटत होता. १९८४ सालातील हा लेख वाचताना मराठीची आजची अवस्था आणि सेनेनं मारलेल्या कोलांटउड्या दोन्ही प्रकर्षानं लक्षात येतात आणि निराशा दाटून येते. या लेखात व्यक्त झालेली मराठीच्या खच्चीकरणाची भीती खरी ठरली आणि हिंदुत्व पांघरुन सेनेनं मराठीच्या तव्यावर केवळ स्वतःची पोळी खमंग भाजून घेतली हे आता स्पष्ट लक्षात येतंय. ********** अंक – माणूस, जानेवारी, १९८४ दिवसेंदिवस मोडकळीस येत असलेल्या मुंबईत मराठी माणसाचे काय स्थान आहे? आज मुंबईत तुम्ही कोठेही फिरा, बसमधून, टॅक्सीमधून, लोकलमधून प्रवास करा, तुमचे मराठीशिवाय चालेल; पण तुम्हाला हिंदी येत नसेल तर महाराष्ट्राच्या या राजधानीत तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही. काही वर्षांपूर्वी शाहीर साबळे यांनी ‘आंधळं दळतंय!’ नावाचं एक सुंदर प्रहसन लिहिले होतं. त्यात त्यांनी मराठी माणूस मुंबईत कसा परका होत चाललाय हे प्रभावीपणे दाखवलं होतं. आज मुंबईत मराठी माणूस नुसता परकाच झालेला नाही तर त्याची जोरदार पीछेहाट शेजारच्या उपनगरांतून चालू झालेली आहे. याचा सर्वच दोष राज्यकर्त्यांवर जात अस ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
[email protected]
5 वर्षांपूर्वीमराठी माणसाला पेटवायचं तरी किती आणि किती नेत्यांनी, मुळात आपण थोडं निरीक्षण केले तर अस जाणवेल की आपले मराठी लोकच ह्याला जबाबदार आहेत, त्यांना आपल्या संस्कृती, परंपरा स्वाभिमान त्याच्याशी काही देणं घेणं नाही, आमच्या ऑफिसमध्ये माझी मराठी भाषा ऐकून मराठी लोक कपाळावर हात मारतात, आम्हाला समजेल अशा मराठीत बोल असे सल्ले दिले जातात? आता काय बोलणार यांना...
saleelk
6 वर्षांपूर्वीलेखात म्हटले आहे, “केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी भाषाच संपूर्ण देशाला एकत्र जोडू शकते अशा आशयाचं विधान केल्यावर भाषा आणि अस्मिता यांचा प्रश्न पुन्हा धगधगू लागला आहे.” पण तसे काही फारसे दिसत नाही. पूर्वी मराठीच्या प्रश्नावर स्वाभिमानाच्या गप्पा मारणारी राजकारणी मंडळी आाणि मराठी जनता, आता गांधीजींच्या माकडांप्रमाणे डोळे, कान आाणि तोंड झाकून गप्प बसली आहेत. भाजपला मराठीबद्दल प्रेम कधीच नव्हते. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेल्या पक्षाला हल्ली मराठी अस्मितेपेक्षा वाराणशीच्या राममंदिराची अधिक काळजी वाटते. पूर्वी छाती ठोकून मातृभाषेच्या हक्कांबद्दल बोलणारी सामान्य जनता आता हिंदुत्व आणि राममंदिराच्या स्वप्नांत मश्गुल आहे. संघराज्यपद्धती आाणि देशातील भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक विविधता ही देशाच्या राज्यघटनेची आधारभूत तत्वे आहेत. त्यांना धक्का पोचेल अशी कुठलीही कृती करण्याचा सरकारला अधिकार नाही. सत्ताधारी पक्षाचे तसे प्रयत्न हाणून पाडायलाच हवेत. पण ते काम कोण करणार? त्याविरुद्ध स्वयंस्फूर्तीने चळवळ करण्यासाठी तीव्र इच्छा आणि पुरेशी लोकसंख्या मराठी माणसाकडे आहे काय? ज्या अल्पसंख्य मराठीजनांच्या मनात अजूनही स्वभाषा आणि स्वसंस्कृती ह्यांच्याबद्दल अभिमान शिल्लक असेल त्यांनी तमिळ, बंगाली, कन्नड अशा भारतातील इतर कट्टर स्वाभिमानी लोकांवरच विसंबून राहायचे आणि मातृभाषेचा पुरस्कार करणार्या शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सावरकर इत्यादी थोरांची पुण्याई ह्या बाबतीत भारताला तारेल अशी आशा करायची !!
साधना गोरे
6 वर्षांपूर्वी१९८४ साली मराठी माणसाला शिवसेनेचा तरी आधार वाटत होता, आता मात्र शिवसेनेलाही मराठी माणसाच्या प्रश्नांचं काही पडलेलं दिसत नाही.
Shyam
6 वर्षांपूर्वीआता शिवसेनाच बदलली आणि भरकटली आहे . मातृभाषा आता कोणालाच आवडत नाही मग आपण काय करणार ?
[email protected]
6 वर्षांपूर्वी30-32 वर्षांपूर्वी अस असेल तर आता विचारायलाच नको, आणि महत्वाच म्हणजे मुंबईकर मराठी लोकांना हिंदी जास्त बोलावी वाटते. देशात दुसरीकडे कुठे एकाच प्रदेशाचे नाव वेगवेगळया भाषेत वेगळे असते का.?, उदा. वांद्रे, बांद्रा किवा बॅन्ड्रा