अर्थसंस्कार

पुनश्च    उदय कर्वे    2017-10-14 06:00:02   

लहानपणी मनाचे श्लोक पाठ केले.त्यात ऐकत होतो की, ‘महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले!’... इत्यादी. त्यावेळेस खरोखरच वाटायचं (मला तरी) हे फक्त महाथोर मंडळींनाच लागू आहे. मोठा होत गेलो तसं कळत गेलं, की ही मरण वगैरे भानगड सगळ्यांनाच लागू असते आणि आपल्या स्वत:लापण लागू असते. त्यात कोणालाही, कुठलेही आरक्षण, वशिले, संरक्षण, हस्तक्षेप यांचा उपयोग नाही. पण हे कळूनही, जणू काही हे कळलेलेच नाही असा आर्थिक व्यवहार करताना काही (अनेक?) मंडळी आजही बर्‍याच प्रमाणात दिसतात. मी बँकेचा संचालक झाल्यानंतर कुठल्या कामासाठी माणसे जास्त भेटायला आली हे आठवतो. त्या वेळेस नोकर्‍या, कर्जे, प्रायोजकत्व ह्यांच्यानंतरचा विषय ठरला आहे तो “डेथ क्‍लेमस्“. म्हणजे त्यांच्या मृत नातलगांच्या खात्यांतील रक्कम कोर्टबाजी करायला न लागता व कमीतकमी कागदकाम (औपचारिकता) व कमी खर्च करून त्यांना मिळावी यासाठी विनंत्या किंवा मार्गदर्शनाच्या अपेक्षा यांसाठी भेटायला आलेल्या या व्यक्ती. पतीच्या पश्चात ८५ वर्षांच्या निराधार एकाकी आजी, मनाविरुद्ध लग्न केलेली मुलगी घटस्फोट घेऊन नंतर अपघातात गेली.... तिची विधवा आई, आधी वडील व नंतर लगेच आई गेली.... त्यांची १९ वर्षांची एकुलती एक मुलगी..... अशा अजूनही किती तरी विचित्र कथा. आणि दुसरीकडे असं काहीही विचित्र नसताना, खूप सुशिक्षित व संपन्न लोकांच्या मृत्यूपश्चात अडकलेल्या रकमा! हे सगळं टाळण्यासाठी खरं तर दोन साध्या गोष्टी उपलब्ध असतात. एक म्हणजे बँकांतील खाती व ठेवी संयुक्त नावांनी ठेवणे ( इन जॉइंट नेमस्) व दुसरी म्हणजे आपली बँक खाती, ठेवी इ. साठी नामनिर्देशन (नॉमिनेशन) करणे. साधारणतः ज्यासाठी ५ ते १० मिनिटेसुद्धा लागत नाहीत अशा या गोष्टी न केल्याने ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अर्थकारण , आरोग्य संस्कार

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    माहिती पूर्ण,असे option असतात हे माहीतच नव्हते

  2. shripad

      5 वर्षांपूर्वी

    शेवटची प्रकरणात नक्की काय झाले? माझ्या मते लहान भावाला मिळायला हवे. नॉमिनी म्हणजे जो खरा वारसदार आहे त्याच्या अनुपस्थितीत ज्याला मिळेल तो.

  3. shripad

      5 वर्षांपूर्वी

    “ देन, आय विल पे इट टू आयदर!“ ???

  4. विनय सामंत

      8 वर्षांपूर्वी

    मस्तच लेख..

  5. ANJALI

      8 वर्षांपूर्वी

    मस्त!

  6. Dhampall

      8 वर्षांपूर्वी

    Interesting छान , thank you

  7. natujaya

      8 वर्षांपूर्वी

    बहुमोल माहितीबद्दल धन्यवाद .

  8. milindKolatkar

      8 वर्षांपूर्वी

    मजा आली. असेच वेगळ्या विषयावरचे अनुभव वाचायला आवडतील. धन्यवाद!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen