आपले वाङ्‌मय- पन्नास वर्षे झाली तरी, तेच ते…

केवळ बदल हाच स्थायी असतो, असे म्हणतात याचा अर्थ असा की आपल्याला आवडो, न आवडो सर्वच क्षेत्रात सतत बदल होतच असतात. परंतु मराठी साहित्य, मराठी संस्कृती हा एक असा विषय आहे, ज्या विषयीच्या चर्चांमध्येही बदल होत नाही आणि परिस्थितीमध्येही बदल होत नाही. बाळ सामंत यांचा पन्नास वर्षांपूर्वीचा हा लेख आपण अगदी आजच्या तारखेचा म्हणून वाचला तरी चालू शकेल. याचा अर्थ आपण सतत अकारण चिंताक्रांत असतो असा घ्यावा की परिस्थिती गेली किमान पन्नास वर्षे तरी ‘जैसे थे’ राहिली हे समाधानकारक आहे ,असा घ्यावा?

**********

अंक: ललित, सप्टेंबर १९६९

” खरोखर वाङ्‌मयाचे सामाजिक अवमूल्यन होत आहे काय? संयुक्त महाराष्ट्र झाला तरी मराठी भाषेची दैन्यावस्था संपलेली नाही, मराठी पुस्तकाची हजाराची आवृत्ती संपायला पाच पाच वर्षे लागतात, वाङ्‌मय आणि वाङ्‌मयकार यांची सामाजिक प्रतिष्ठा लोपलेली आहे…. “

सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. बाळ सामंत यांनी व्यक्त केलेले हे परखड विचार साहित्यिकांना आणि साहित्याच्या निष्ठावान्‌ वाचकांना चिंत्य वाटावेत.

गेल्या महायुद्धाचे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनावर फार दूरगामी परिणाम झाले. वाढत्या महागाईच्या प्रमाणात मध्यमवर्गीयांच्या अर्थोत्पादनात वाढ झाली नाही. आणि त्यामुळे मध्यमवर्गीयांचे दैनंदिन जीवन फार ओढग्रस्तीचे आणि खडतर झाले. मध्यमवर्गीयांचा जीवनकलह अत्यंत तीव्र झाल्यामुळे या वर्गाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनातील नेतृत्व हळूहळू संपुष्टात येऊ लागले. एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य आले आणि नव्याने स्थापित झालेल्या लोकशाही राजवटीच्या प्रस्थापनेस ज्या मध्यमवर्गाने हातभार लावला तो मध्यमवर्ग स्वत:चे परंपरागत नेतृत्व हरवून बसणार अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर प्रौढ मतदानपद्धतीने भारतामध्ये ज्या चार सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकांत अखेर अखेर निरुत्साही, उदासीन आणि अकार्यप्रवण मतदार एवढीच भूमिका मध्यमवर्गाच्या वाट्याला आली.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu