पैंजण दिवाळी अंक, १९६७ बालगंधर्व जाऊन बरेच दिवस झाले. त्यांची आठवण मनाला फार अस्वस्थ करते. गंधर्व कंपनी बंद होऊन बरीच वर्षे झाली, तरी त्यांचे माझे पूर्वीसारखेच प्रेम होते. ते कधीही पुण्याला आले की, मी त्यांना भेटायला जाई. दर गुरुपौर्णिमेला त्यांची पूजा करीत असे. लहानपणी आई-वडील गेले पण नारायणरावांनी वडिलांची उणीव भरून काढली. त्यांनीच मला लहानाचे मोठे केले, माझे लग्न केले. काही चुकलं म्हणजे जसे ओरडायचे, वा मारायचे तसे प्रेमभरानं पोटाशीही धरीत, पाठीवरून हात फिरवीत. हॉस्पिटलमध्ये ते आजारी होते तेव्हा जरी ते पहात नव्हते, बोलत नव्हते, तरी मला आधार वाटे. पण आता खरोखरीच माझा आधार तुटला, मी पोरका झालो. मला हरि, हऱ्या, हरबा अशा नावानं हाका मारणारं कुणी राहिलं नाही. आमच्या बामणोलीला शाळा नसल्यामुळे मी सातारला वडिलांच्या मित्राकडे-रावबहाद्दूर पाठक यांच्या घरी इंग्रजी शाळेत जाण्यासाठी रहायला होतो. त्यावेळी माझे आई-वडील दोघेही नव्हते. गावाला चुलते व मोठे भाऊ असत. भावाने नुकतेच लग्न केले होते. त्यावर्षी दिवाळीला मी घरी आलो. घरी नवी वहिनी आली होती. त्यामुळे मला खूप उत्साह वाटत होता. घरची सांपत्तिक परिस्थिती चांगली होती. घरी ५-६ म्हशी व २-४ गायी होत्या त्यामुळे दूध खूप येई. साहजिकच मी वहिनीला बासुंदी करण्याचा आग्रह केला. ही गोष्ट माझ्या चुलत्यांना बिलकूल आवडली नाही. व ‘आम्ही कष्ट करतो आणि तुम्ही आयत्या बिळावर नागोबा का’ वगैरे अनेक अपमानकारक व जिव्हारी लागतील असे ते बोलले. साहजिकच मला राग आला व परत घरी न येण्याचा मी निश्चय केला. गावात माझे दुसरे एक लांबचे भाईबंद रहात होते त्यांच्याकडे गेलो व त्या काका-काकूंना सर्व हकीगत सांगितली. त्यावेळी काकू म्हणाल्या, ‘इतके भांडण झाल ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
दीर्घा
, पैंजण
, अनुभव कथन
, व्यक्ती विशेष
amolnirban
6 वर्षांपूर्वीखरोखर सुंदर लेख! बालगंधर्व माणूस म्हणूनही किती मोठे होते हे प्रत्ययाला आले.
hpkher
6 वर्षांपूर्वीभावपूर्ण लेख, त्याकाळातली परिस्थिती डोळ्या समोर उभी राहते