उभ्या आयुष्यांत एकच कुस्ती हरलेला नागपूरचा पैलवान

मल्ल, पैलवान म्हटले की आपल्याला हटकून कोल्हापूर आठवते. नागपूरचा  कुस्तीशी काही संबंध आहे, असा विचार आपण स्वप्नातही करणार नाही. परंतु भोसल्यांच्या काळात नागपूरात मल्लविद्या चांगलीच फोफावलेली होती. त्यातही दया पैलवान लढणार म्हटलं की गाव गोळा होत असे. या दया पैलवानाची कथाही तेवढीच जबरदस्त आहे. ‘अमृत’मध्ये पंचावन्न वर्षांपूर्वी आलेला हा लेख नागपूरची एक वेगळीच बाजू दाखवतो..

**********

अंक- अमृत, जानेवारी १९६५

नागपूर हे शहर एके काळी नागपूरकर राजे भोसले यांची राजधानी होते. तेथे त्यांनी मल्लविद्येला सर्वतोपरी पोषक परिस्थिती निर्माण करुन नागपूर हे मल्लांचे प्रमुख केंद्र केले. त्या काळी नागपूर हे भारतीय मल्लांच्या तोडीचे मल्लांचे आगर म्हणून प्रसिद्ध होते. ते नुसते मल्लांचे केंद्र म्हणूनच प्रसिद्ध होते असे नव्हे तर तेथील मल्लांचे एक आगळेच वैशिष्ट्य दाखवितां येण्यासारखे आहे. आमच्या इकडील मल्ल बुद्धीशी फारकत झालेला; ललितकलेचे त्याला वावडे असलेला; गायन, वादन, नृत्य यांची आवड नसलेला असतो. त्याला फक्त चोवीस तास आखाडा नि लाल माती, जोर बैठका आणि खुराक एवढ्याच गोष्टी ठाऊक. पण नागपूरकडील मल्लांचे तसे नाही. वेद, विद्या, संगीत, नाट्य, नृत्य, ललित वगैरे विद्येत नि गुणांत प्राविण्य मिळविणारे मल्ल तिकडे होऊन गेले. तसेच अनेक सामर्थ्यशाली पुरुषांनीही नागपूर शहराला कीर्तीचा लाभ मिळवून दिला. हत्तीचे शेपूट धरुन त्याला फरफरा ओढणारे जय व्यंकटाचार्य; दगडाचा अतिशय वजनदार नाल गळ्यांत अडकवून तीनचार मैल अंतर पळत जाणारे तनसुख पैलवान; माजलेल्या बैलाशी झुंज देऊन त्याला वठणीवर आणणारे लक्ष्मणसिंग वस्ताद;

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. मस्तच

Leave a Reply

Close Menu