साहित्यसंमेलनाचे राजकारण आणि अर्थकारण

पुनश्च    मिलिंद जोशी    2019-10-18 10:00:28   

अध्यक्षीय निवडणूकीचा मार्ग बदलून नियुक्तीचा नवा रस्ता शोधूला गेला तरीही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा वाद मात्र सुरुच आहे. साहित्याची चर्चा कमी आणि वाद अधिक ही जणू आपली परंपराच आहे. संमेलनाला राज्य सरकार २५ लाख रूपये देते आणि संमेलनात कोटभर रुपयांची पुस्तकविक्री होते यापलीकडे संमेलनाच्या अर्थकारणाची, राजकारणाची थोडीफार ऐकीव माहिती आपल्याला असते. परंतु संमेलन मुळात समजून घ्यायचं असेल तर त्याची सगळीच रचना आधी अभ्यासून पाहिली पाहिजे. प्रस्तुत लेखात संमेलनाचा इतिहास, निवडणूक, मतदार, खर्च याविषयाची विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. हा लेख २०१० साली प्रसिद्ध झालेला आहे, तेंव्हा अर्थातच अध्यक्ष निवडणुकीची पद्धत होती, हे हा लेख वाचताना लक्षात घ्यावे लागेल. लेखक 'मसाप'चे पदाधिकारी आहेत. १९६१ मध्ये दत्तो वामन पोतदार यांच्या पुढाकाराने ‘मराठी साहित्य महामंडळा’ची स्थापना झाली. त्यावेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाची स्थापना झाली, तेव्हा ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’, ‘मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई’ आणि ‘विदर्भ साहित्य संघ, नागपूर’ या चार घटक संस्थांचा संघ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, गरज पडल्यास त्यावर चर्चा घडवून आणणे आणि एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे ढोबळ मानाने साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते. महामंडळाच्या स्थापनेच्या वेळी महामंडळाने अखिल भारतीय मराठी भाषकांची संमेलने भरविण्याचे काम हातती घ्यावे, असे आपल्या घ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , दीर्घा , भाषा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen