विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे यांनी केलेला हा एक अत्यंत वेधक साहित्यिक प्रयोग आहे. ‘२२ जुलै १९९५’ या शीर्षकाची कथा त्यांनी १९८१ साली लिहिली. म्हणजे केवळ १४ वर्षांनतरचा तो भविष्यकाळ होता. विज्ञानकथा लेखक सहसा एवढा नजिकचा भूतकाळ घेत नाहीत. प्रत्यक्षात १४ वर्षांनी जेंव्हा हा दिवस उगवला तेंव्हा काय झाले? ती कथा म्हटले तर खोटी ठरली, म्हटले तर नाही. परंतु या निमित्ताने विज्ञानकथा आणि त्यांतील भविष्यवेध यावर लोंढे यांनी हा सुंदर लेख लिहिला. तो किर्लोस्करच्या ऑगस्ट १९९५च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. लक्ष्मण लोंढे (जन्म : १९४५; मृत्यू : ६ ऑगस्ट, २०१५) हे वित्तीय संस्थेत नोकरी करीत मात्र त्यांनी लेखक म्हणून विज्ञानकथांचा प्रांत निवडला. ‘पाण्यात राहणारा मासा’, ‘देवांसि जिवे मारिले’, ‘नव्या शतकाच्या उंबरठ्यावर’ ही व इतर अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. ********** अंक: किर्लोस्कर ऑगस्ट १९९५ ‘२२ जुलै १९९५’ ही मी लिहिलेली एक, मला आणि वाचकांना आवडलेली, विज्ञानकथा. ही कथा मी १९८१ साली लिहिली. ती ‘किर्लोस्कर’च्या हीरक महोत्सवी विशेषांकात प्रसिद्ध झाली. योगायोग असा की त्यावेळी ‘किर्लोस्कर’चे संपादक श्री. ह. मो. मराठे हे होते. मध्यंतरी अन्य काही नियतकालिकांमध्ये काम करून, पुन्हा प्रत्यक्ष २२ जुलै १९९५ लाही ह.मो.च किर्लोस्करच्या संपादकपदी आहेत! कथा प्रसिद्ध झाली. काही वाचकांची ती आवडल्याबद्दलची मला पत्रं आली. नंतर १९८४ साली ही कथा समाविष्ट असलेला माझा पहिला विज्ञानकथा संग्रह प्रकाशित झाला. या संग्रहाचं नावही मी ‘२२ जुलै १९९५’ हेच ठेवलं आहे. या संग्रहाला महाराष्ट्र शासनाच्या ललित विज्ञान विभागातला सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा साहित्य पुरस्कार मिळाला. अशी या कथ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
arush
5 वर्षांपूर्वीमूळ गोष्ट छोटी आणि फाफट पसारा जास्ती
shripad
5 वर्षांपूर्वीछान लेख. असे विज्ञानावरील अजून लेख वाचायला आवडतील.