अंक - माणूस, २२ जुलै १९७८ दीर्घकाळ प्रतीक्षा करायला लावल्यानंतर थिएटर अकॅडमीने जून-अखेरीस ‘तीन पैशाचा तमाशा’ रंगभूमीवर आणला. त्याच्या गुणवत्तेचा विचार करण्यापूर्वीच, मराठी रंगभूमीवरचा तो एक अगदी नवा व महत्त्वाचा प्रयोग आहे हे मान्य झाल्यामुळे ‘माणूस’मधून त्याची सविस्तर दखल घेण्याचे ठरले. त्यासाठी लिहिलेला हा लेख ही माझी व्यक्तिगत प्रतिक्रिया असली, तरी ती निश्चित व शब्दांकित करण्यापूर्वी ज्यांच्याशी मी चर्चा केली त्या सर्वांनी, म्हणजे डॉ. जब्बार पटेल, श्री. आनंद मोडक, श्री. भास्कर चंदावरकर आणि श्री. पु. ल. देशपांडे व माझे मित्र संजीव मंगरूळकर, मंजिरी परांजपे यांनी दिलेल्या सहकार्याची नोंद प्रथमच करणे अगत्याचे आहे. हा तमाशा कोणाचा? ‘तीन पैशाचा तमाशा’ हा ब्रेश्टचा की जब्बार पटेलांचा की पु. ल. देशपांडे यांचा इथपासूनच चर्चा करायला हवी. कारण त्याच्या संग्रहणाला निकंष कोणते लावायचे हे अंशतः त्यावर अवलंबून आहे. नाट्यप्रयोगाची जाहिरात ब्रेश्टचा नामोल्लेख करीत नाही. ती पु. ल. देशपांडे यांचा तीन पैशाचा तमाशा असेच म्हणते व तीच भूमिका त्याचे सादरकर्ते तर्कपातळीवरही घेतात. ‘पु. लं. नी लिहिलेलं एक नाटक व त्याचा आम्ही केलेला एक प्रयोग, यांच्याबद्दलच तुम्ही स्वतंत्रपणे लिहा-बोला. सतत ब्रेश्टचा संदर्भ घेण्याची निकड दिसत नाही’ असा आपला आग्रह डॉ. जब्बार यांनी स्पष्टपणेच बोलून दाखविला. श्री. पु. ल. देशपांडे यांनीही वेगळ्या व किंचितशा अनाग्रही शब्दात हीच भूमिका मांडली. ब्रेश्टच्या नाटकावरून स्फूर्ती घेतली असली तरी रूपांतरप्रक्रिया वगैरेमुळे वेगळे झालेले एक मराठी नाटक (पु. लं. च्याच शब्दात ‘एक स्वतंत्र piece’) या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितले जावे, हा त ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
[email protected]
5 वर्षांपूर्वीहा शेंदूर खरवडून वास्तविक दर्शविणारे लेखनप्रकार फ़ार आवडला .जब्बार यांचा घाशीरामच्या संगीताचा हँग ओव्हर बराच काळ उतरला नाही ! हे परीक्षण वाचल्यावर पु .ल .यांनी काय प्रतिक्रिया दिली वा दिली असती हे जाणणे मजेशीर आहे !
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीअप्रतिम रसग्रहण.. मोठ्या नावांचा दबाब न बाळगता खुल्या मनाने जे वाटलं ते स्पष्ट शब्दात मांडले आहे.. मस्त..