आठवड्याचा अग्रलेख- १४ ऑक्टोबर २०१९


एकतर निवडणुकांचा माहौल, त्यातच दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क आणि रेशीमबाग मधील भाषणे, निवडणुकीतील बंडखोरांची कवित्वे, कॉंग्रेस पक्षाची थकलेली अवस्था हे विषय गेल्या आठवड्यात प्रामुख्याने अग्रलेखांत डोकावत होते. याखेरीज यंदा पावसाची अतोनात वृष्टी, पाकिस्तानची बेइज्जती, इम्रान खान, असे नेहमीचे विषयही होतेच. पण या शिवाय अनेक छोटी छोटे मुद्दे एकेका अग्रलेखांतून मांडले गेले. उदाहरणार्थ, नाट्यकर्मी अरुण काकडे यांच्या निधनावर केवळ तरुण भारत बेळगावने अग्रलेख लिहिला आहे. नोबेल विजेते तोकारचूक आणि हांडके यांची दखल सकाळने घेतली आहे. रस्त्यांची वाईट अवस्था झाल्याने मेक्सिकन महापौराची तिथल्या लोकांनी काढलेली धिंड, महाराष्ट्र टाईम्सने टिपून इथल्या लोकांना एक मार्ग दर्शवला आहे. तणाव उर्फ स्ट्रेस आणि मानसिक आरोग्य यावर लोकसत्ताने लिहिलं आहे. राज ठाकरेंच्या सभेची एकट्या पुढारीने दखल घेतली. राफेल विमानाच्या पूजनावरून सोशल मिडीयात एकच कल्लोळ माजला असला तरी, अग्रलेखांतून हा विषय फक्त तरुण भारत मुंबई आणि नागपूर या दोन संघाच्या मुखपत्रांनी मांडला आहे. विशेष उल्लेखनीय अग्रलेख ८ ऑक्टोबरला सकाळमध्ये वाचायला मिळाला. ब्रिटीश नंदी या टोपणनावाने लिहिणारे प्रवीण टोकेकर यांची शैली सहज ओळखू येणारी. राजकीय विडंबनात्मक लेख ज्यांना आवडतात त्यांनी हा चुकवता कामा नये. https://bit.ly/31cvdn9 मात्र या आठवड्यात सर्वाधिक चर्चा झालेला विषय अर्थातच मुंबईतील आरे कॉलनीमधील वृक्षतोड हा होता. सात वृत्तपत्रांनी त्यावर अग्रलेख लिहिले. महाराष्ट्र टाईम्सने कधी नव्हे ते ठाम भूमिका घेऊन मेट्रोचे आणि वृक्षतोडीचे समर्थन केले आणि त्यावर चक्क दोन अग्रलेख लिहिले. ही घटना अधोरेखित करा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सुधन्वा कुलकर्णी , आठवड्याचा अग्रलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen