निवडणुकांची धामधूम असल्याने गेल्या आठवड्यात खरंतर अग्रलेखांचे मुख्य विषय तेच असतील असं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात इतके वेगवेगळे मुद्दे उत्पन्न झाले की त्यांची दखल घेता घेता राजकारण तुलनेने जरा कमीच चघळलं गेलं. ही बाब अर्थात स्वागतार्हच होती. या आठवड्यात अभिजीत बॅनर्जी यांना मिळालेला नोबेल पुरस्कार निम्म्या अग्रलेखांतून मांडला गेला. अयोध्येतील राममंदिर प्रश्नावर अंतिम निवाडा शेवटच्या टप्प्यात आला आहे. या महिन्यात लागणाऱ्या त्याच्या निकालाचा उहापोह पाच अग्रलेखांतून केला गेला. विविध पक्षांचे निष्फळ जाहीरनामे हा विषय अर्थातच काही अग्रलेखांनी मांडला होता. त्याचप्रमाणे निवडणूक प्रचाराची खालावत जाणारी पातळी हा सार्वकालीन अमर विषय वर्तमानपत्रांनी चघळला नसता तर त्यांना फाऊल मिळते. त्यामुळे तोही चर्चेत होताच. सावरकरांना भारतरत्न देण्याची भाजपची मागणी या फेसबुकवरील गरमागरम विषयावर काही अग्रलेखांनी आपले हात धुवून घेतले. सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होण्याची घटना तीन अग्रलेखांचा विषय होता. याखेरीज असंख्य विषय असे होते की ज्यांची दखल फक्त एकेका वर्तमानपत्रानेच घेतली. त्यांची यादी बघितली तर लक्षात येईल की हा आठवडा किती विविध घडामोडींचा होता. १) मान्सूनचे धडे २) प्रफुल्ल पटेल यांची ईडी चौकशी ३) सीतारामन यांचे भूतकाळावर खापर ४) बँक ठेवीदारांचे हित ५) सर्वपक्षीय महिला नेतृत्व ६) हंगर इंडेक्स आणि भूकबळी - दोन अग्रलेख ७) अरुंधती रॉय यांची लाजिरवाणी अवस्था ८) पराकला प्रभाकर यांचा हिंदू मधील लेख ९) दिल्ली आणि आम आदमी पार्टी १०) वीज ग्राहकांची समस्या ११) तुषार गांधींचे वक्तव्य १२) भारताचा पुणे कसोटी विजय मात्र या सर्व अग्रलेखांत आश्चर्यकारकरित्या सर्वाधिक चर्चिला गेलेला विषय होता, ची ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .