“सुरुवातीस आमच्या या कार्यकर्त्यांचे स्वतःचे अनुभव जाहीरपणे त्यांच्या छायाचित्रांसकट छापण्याबद्दल आम्ही काहीसे साशंक होतो. या सर्वांचेच हे अगदी ‘व्यक्तिगत-खासगी’ अनुभव आहेत. त्या सर्वांचाच बदलाचा प्रवास एका वाटेने चालू आहे. पण आमच्या या सहकाऱ्यांनीच आमच्या काहीशा सांशंक विचाराला डावलून छायाचित्रांसकट त्यांचे अनुभव छापण्यास अनुमती दिली...” एका कॅलेंडरच्या निमित्ताने डॉ. अजित कानिटकर यांनी मांडलेला हा ताळेबंद ********** अंक अंतर्नाद – जानेवारी २०११ गल्लीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर संमेलने होतात, ठराव केले जातात. महिला दिवस-महिला वर्षे साजरी होतात, पण समाजाच्या या मानसिकतेत खरोखर, किती मूलभूत बदल झाला आहे? नव्या वर्षाची सुरुवात म्हणजे कार्यालयात टपालाने येणारी खूप सारी शुभेच्छा पत्रे, दैनंदिन्या व रंगीबेरंगी कॅलेंडर्स. पाठविणारेही बहुतेक जण परिचित, कामाशी संबंधित असलेल्या संस्थांचे प्रमुख, संस्थांमधील कार्यकर्ते असे. पूर्वी नोकरीत नसताना अशी डायरी-कॅलेंडर ‘फुकट’ किंवा ‘सप्रेम भेट’ म्हणून मिळण्याचे एक वेगळे अप्रूप असायचे. अशी ही भेट लक्षात राहायची. आता नव्या वर्षाचे हे एक प्रकारचे ritual च झाल्यासारखे आहे. मोबाइल फोन व त्यावरच्या SMS च्या सोयीमुळे तर शुभेच्छा देण्या-घेण्याच्या ट्रॅफिकमध्ये जॅम होण्याइतकी गर्दी वाढली आहे. या पार्श्र्वभूमीवरच हातात आलेल्या एका कॅलेंडरने लक्ष वेधून घेतले. कॅलेंडर इंग्रजी भाषेत छापलेले होते. पहिल्याच पानावरचा मजकूर लक्षवेधी होता- ‘हिंसारहित मनांची मशागत करण्यासाठी... स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी व स्त्री-पुरुष समाजनिर्मितीसाठी, पुरुषांबरोबर कार्यरत होण्यासाठी....’ आतमध्ये महिन्यांच्या पा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
arush
5 वर्षांपूर्वीखूप छान
asiatic
6 वर्षांपूर्वीसुंदर लेख . कार्यकर्त्यांचे प्रामाणिक कथन.
bookworm
6 वर्षांपूर्वीविषयाची सुयोग्य निवड! अप्रतिम!!
SMIRA
6 वर्षांपूर्वीसुंदर . प्रत्येक घरात पालकांकडून असे समानते संस्कार व्हावेत