इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानांत स्थापन झाले तेव्हा त्यांनी इंग्रजी शिक्षण सुरू केले, आपल्या चालीरीती श्रेष्ठ आहेत व आपला धर्म मोठा आहे असे ते भासवूं लागले. ख्रिस्ती लोकांनी रविवारी सुंदर वेष करावा आणि गावांतील देवळात (Church) प्रार्थनेला जावे हे दृश्य हिंदी लोकांना मोठे रमणीय वाटे. परकीयांच्या संगतीने आपल्या धर्माची पहाणी करावी, चिकित्सा करावी अशी वृत्ती हिंदुंमध्ये उत्पन्न झाली. अनेक धर्मसुधारक निघाले. या धर्मसुधारकांनी धर्मभावनेची प्रचंड लाट निर्माण केली. त्यापैकी राजा राममोहन राय यांच्या ब्राम्हो समाजाविषयीचा हा लेख. इतर पंथांचा इतिहास आणि कार्य आपण या मालिकेतील ज्ञान आणि संदर्भसंपन्न अशा पुढील लेखांमध्ये पाहणार आहोत. जवळपास ८२ वर्षांपूर्वीची ही लेखमाला आहे. अंक – आनंद, मार्च १९३७ ज्ञानसागरावरील सफरी- भाग २ या विषयाची प्रस्तावना करतांना मागे सांगितलेच होते की, परकीय लोकांची उपासना, समाजपद्धती वगैरे पाहून आपल्या सुशिक्षित लोकांना आपल्या समाजांत व धर्मांत पाश्र्चात्य वळणाची सुधारणा करण्याची आवश्यकता भासूं लागली. हे एक तऱ्हेने चांगलेच होते. कारण नवीन बलवान राजे आले म्हणजे त्यांचे रीतरिवाजच काय, पण धर्म देखील स्वीकारावयाचा अशी जित लोकांची इच्छा होते. आपण कांही तरी कमी आहोंत म्हणूनच जिंकलो गेलो आणि आपले राज्यकर्ते हेच खरे थोर व श्रेष्ठ आहेत ही हीनत्वाची भावना नेहमी जित लोकांत असते. आणि अशाच वेळी आपले सर्व सोडून दुसऱ्याचा धर्म व आचारविचार घेण्याचा घातकी क्रम पुष्कळ लोक आचरतात. हिंदुस्थानांत इंग्रजी राज्य आले आणि जरी लोकांना आपल्या उणीवांची जाणीव झाली तरी सुदैवाने प्राचीन सर्वच सोडून देण्याची वृत्ती बळावली नाही. नवीन इं ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
vrudeepak
5 वर्षांपूर्वीअतीशय सुसूत्रपणे विषयाची मांडणी केली आहे. ब्राह्म विचारांचा महाराष्ट्रीय विचारवंतांवरील प्रभाव ही माहिती ही दिली असती तर उत्तम झाले असते.