‘‘मुलाचे शील सुधारावे म्हणून जुन्या कवींच्या निवृत्तीपर कविता ठासून भरलेल्या असतात. काय करू नये ह्याबद्दल एक कविता आठवतेय. ‘गांजा ओढू नको, सुरा पिऊ नको, तूं भांग घोटूं नको--’ आणि शेवटी म्हटले आहे ‘वेश्येसी पाहू नको.’ आठ नऊ वर्षाच्या मुलाला वेश्या या शब्दाचा अर्थ शिक्षकाने कसा पटवून द्यावा?’’ वि. वि. बोकील यांनी हा प्रश्न विचारला होता १९४७ सालची पाठ्यपुस्तके पाहून! थोडक्यात काळ कुठलाही असो, पाठ्यपुस्तके आणि पढतमुर्ख यांची संगत काही सुटत नाही. आजच्या पुस्तकांमधील चुका आपण नेहमीच वाचतो. इंग्रजांच्या काळात तयार झालेली पाठ्यपुस्तके काय ‘उजेड पाडत होती’ यावर सत्तर वर्षांपूर्वीचा लेख प्रकाश टाकतो. विष्णु विनायक बोकील (२ जून १९०३ - २२ एप्रिल १९७३) हे लोकप्रिय लेखक, पटकथालेखक, नाटककार आणि शिक्षणतज्ज्ञ होते. ‘कुबेर की रंक’, ‘तू तिथे मी’ व इतर कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ‘तारांबळ’ ‘लगीनघाई’ आदी नाटके लिहिली. ‘चिमुकला संसार’ हा त्यांचा गाजलेला चित्रपट. बोकील यांचा हा लेख मुळात आकाशवाणीवरील (तेंव्हाचे आल इंडिया रेडिओ) भाषण होते. ............................. अंक- रसना, जानेवारी १९४८ प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ, सुप्रसिद्ध कादंबरीकार व प्रथितयश कथालेखक श्री. वि. वि. बोकील यांनी ३१ ऑक्टोबर १९४७ रोजी क्रमिक पुस्तकावर मुंबई रेडिओवर जे सुप्रसिद्ध व मार्मिक भाषण केले ते ऑल इंडिया रेडिओच्या परवानगीने वाचकांना सादर करीत आहो. आम्ही श्री. बोकील व रेडिओ कंपनी यांचे आभारी आहोत. ‘आमच्या वेळेला असं नव्हतं बुवा’ म्हणून मागच्या आठवणींना उजाळा द्यायचा व नवीन गोष्टींना नाके मुरडायची ही म्हाताऱ्या लोकांची खोड पुष्कळांना पाठ असेल. या झाल्यागेल्या मंडळींना जुने ते ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीआचार्य अत्रेंच्या वाचनमालेचा उल्लेख आढळला नाही .
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीवाह...इंग्रजांची राजवट स्थिरावल्यावर, शालेय शिक्षण विषयक छान आणि नवीन माहिती मिळाली...