'एकोणीसशे चौऱ्यांशी' मधलं उध्वस्त विश्र्व


जॉर्ज ऑरवेलची ‘एकोणीसशे चौऱ्यांशी’ ही कादंबरी प्रकाशीत झाली १९४९ साली. राजकीय सत्ता आणि शक्ती, माणसाचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य कसे गिळंकृत करते, करणार आहे, याचे काल्पनिक आणि तरीही अनेक संदर्भांत वास्तव वाटावे असे चित्रण ‘३५ वर्षांनंतरचे वास्तव’ म्हणून ऑर्वेलने या कांदबरीत केले होते. १९८०च्या आसपास या कादंबरीची चर्चा नव्याने सुरु झाली आणि साहजिकच १९८४ साली तिचे विविध प्रकारे मूल्यमापन केले गेले. अशा प्रकारच्या लेखनात त्याकाळी ‘माणूस’ आघाडीवर होते. माणूसच्या जानेवारी १९८४ च्या अंकात शिरीष सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या या लेखात कादंबरीचा आशय आणि जगभरातील तत्कालिन वर्तमान यांतील संबंध सोप्या सरळ भाषेत सांगितला आहे. यातून ऑर्वेलच्या चिंतनातील खोलीचाही प्रत्यय येतो ................. अंक – माणूस जानेवारी १९८४ जॉर्ज ऑरवेलची ‘एकोणीसशेचौऱ्यांशी’ ही कादंबरी म्हणजे वर्तमानकाळाला भविष्याचं पडलेलं भेसूर स्वप्न. या दुःस्वप्नाच्या दाहकतेचा अनुभव जरूर मूळ कादंबरी वाचून घ्यावा असा आहे, तरी त्याच्या संक्षिप्त अनुवादानंही त्याचा बधिर करून टाकणारा टका वाचकांपर्यंत पोचवलाच असेल; पण ‘नाइन्टीनएटीफोर’चं यश निव्वळ भविष्यकथनात नाही. ‘सायन्स फिक्शन’शी ओळख असणाऱ्या वाचकांना ऑरवेलच्या कादंबरीचा संक्षेप वाचून चटकन् हे वेगळेपण जाणवलं असेल की, भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्य दाट सावल्या कादंबरीत विखुरल्या आहेत. एक सलगता, साखळी, कंटिन्युइटी त्यात आहे. आयुष्यभराच्या मुशीत ऑरवेलनं भविष्यवेधाचं हे रसायन शिजवलं, त्यामुळं त्याला वास्तवाचा एक अतूट धाका जोडला गेला. ती सर्वस्वी कल्पना-कथा बनली नाही आणि ऑरवेलची प्रतित्रा त्या जातीची नव्हतीही. कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्यांत सतत रमण्याची त्याची वृत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


माणूस , साहित्य रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. vishwasdeshpande

      4 वर्षांपूर्वी

    पुस्तक खूप वास्तव असले तरी ते निराशाजनक वाटते.

  2. vishwasdeshpande

      4 वर्षांपूर्वी

    मी सध्या तेच पुस्तक वाचत असल्यामुळे मला सर्व पटले आहे. थोडक्यात पुस्तकाची वाचकाला पुरेशी ओळख करून दिली आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen