काळासोबत केवळ माणूसच बदलतो असं नव्हे तर ज्या संकल्पनांवर माणूस पोसला जातो त्याही बदलतात, कारण त्यांनाही काळाचे संदर्भ असतात. उदाहरणार्थ, मराठी माणसे परदेशी स्थायिक होण्याचे प्रमाण वाढल्यावर सत्यनारायणाच्या पूजेची संकल्पना बदलली. पूजा सांगणाऱ्या ब्राह्मणाऐवजी ध्वनिमुद्रित पूजा केली जाऊ लागली. केळीच्या खांबांना पर्याय शोधले गेले. काहीही झाले तरी आपले ते टिकवून ठेवावे वाटते आणि परदेशात तर ते अधिकच तीव्रतेने वाटते, कारण त्यात आपले वेगळे अस्तित्व दाखवून देण्याची ताकद असते. पन्नास वर्षांपूर्वी मीनाक्षी परांजपेनामक एका मराठी गृहिणीने कॅनडामधील स्थानिक महिलांना 'संक्रांत आणि तिळगूळ' म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न केला होता, त्याची हा कथा...मात्र या कथेचा शेवट अपेक्षेप्रमाणे गोड बोलण्याने झाला नाही म्हणून (पन्नास वर्षांपूर्वीच) हा लेख जन्माला आला. सौ. मीनाक्षी परांजपे यांचे वास्तव्य सध्या कॅनडात व्हँकुव्हर येथे आहे. तिथल्या लोकांना संक्रांतीच्या सणाची माहिती करून देण्यासाठी त्यांनी योजलेल्या उपक्रमाचा आणि त्याचवेळी एका भारतीय महिलेकडूनच त्यांना झालेल्या विरोधाचा हा एक अनुभव. ********** अंक – माहेर, जानेवारी १९६९ शीर्षक वाचून वाचकांना वाटेल—संक्रात येण्यापूर्वीच तिचे गमन, फळ इत्यादी सांगण्याचा हा कुठला प्रकार? परंतु त्या अर्थाने मी संक्रांतीचे गमन सांगत नाही. ‘ह्या वर्षीची संक्रांत उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे—पूर्वेकडे पाहात आहे’ असा प्रकार नाही. तर खरोखरच पूर्वेकडील राष्ट्रांमधील, भारतांतील संक्रांतीची पद्धत पाश्चिमात्यांना कशी वाटली ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे आल्यावर पहिली दिवाळी आम्ही फक्त काही भारतीय मंडळींना एकत्र जम ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
vilasrose
5 वर्षांपूर्वीलेख खूपच आवडला.
ajitpatankar
5 वर्षांपूर्वीसंक्रांत म्हटल्यावर गिरगाव आठवतेच.... आजच WhatsApp वर एक संदेश आला.. गिरगावातली संक्रांत एका गिरगावकर मित्राने लिहीलेला हा ब्लाॅग आज पुन्हा एकदा वाचनात आला, तुम्हीपण वाचा........ बोरिवलीतल्या घराच्या टेरेसवर मुलाला पतंग उडवायला शिकवत होतो. मुलाला पतंग “बदवून” देउन त्यच्या हातात पतंगाचा मांजा दिला आणि अंगजात “पुरुष-सुलभतेने” समोरच्या टॉवर मधील कोण कोण भाभ्या आपल्याकडे बघताहेत का हे बघत उभा राहिलो. बरोबर इतरही काही बिल्डींगवाले होते. आणि अचानक कानावर शब्द आले. “अरे पोरा, पतंग साईडला घे. तो पाठच्या टॉवरमधून उडलेला लाल बाण-छाप ‘घेतोय’ तुला, बघ.” मी हबकलोच. या कट्टर जैनांच्या वस्तीत चक्क गिरगावातील अट्टल स्लॅंग? मी पोराच्या हातातून पतंगाचा मांजा घेतला आणि पतंग साईडला घेतला आणि त्या लाल बाण छाप उडवणाऱ्या पाठीमागील टॉवरमधल्या कॉलेज-कुमाराकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. पतंग परत मुलाच्या हाती दिला आणि सरळ माझ्या उपकारकर्त्याकडे जाऊन विचारलं, “अहो, तुम्ही गिरगावातले का?” आता हबकण्याची पाळी त्याची होती. “तुम्ही कसं ओळखलं?” मी हसलो आणि मनातल्या मनात म्हटलं, “साला, यु कॅन टेक अ पर्सन आऊट ऑफ गिरगाव, बट यु कॅन नेवर टेक गिरगाव आऊट ऑफ अ पर्सन.” त्याला म्हणालो, “हे तुम्ही जे “तुला घेतोय”, “बाणछाप” वगैरे शब्द वापरलेत, ते अजून दुसरीकडे कुठे ऐकायला मिळतात?” तो हसला. तो एक साउथ इंडियन गिरगावकर निघाला, पण त्याचं आयुष्य मुगभाटात गेलेलं. तो बोलला, “आम्ही घरातही मराठीच बोलतो. ‘गिरगावातली संक्रात’ कोणताही गिरगावकर आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही.” आणि मग भूतकाळात जाताना आयुष्यातील सगळ्या संक्रांती भराभर नजरेसमोर सरकायला लागल्या. लहान असताना पतंग उडवायला शिकायचं म्हणजे कोणालातरी गुरु बनवण्याखेरीज पर्याय नव्हता. एकदा शिष्यत्वाची दीक्षा घेतली की ओघानेच “फिरकी” पकडणं आलं. ‘फिरकी पकडणं’ ही सुद्धा एक कलाच असायची. नवीन शिष्याने दोन दांड्या पकडायच्या आणि एकदा थोडी सिनीऑरिटी आली, की मग एक दांडी पकडायची. त्या दांडीचं टोक हे बरोबर पतंग उडवणाऱ्या गुरुच्या दुसऱ्या हाताच्या भोकाकडे निर्देशून पाहिजे, नाहीतर “ढील” बरोबर येत नाही, वगैरे वगैरे. ते असो. एकदा फिरकी पकडली की लक्ष आजूबाजूंच्या पोरींकडे द्यायची मुळीच सोय नव्हती. गुरुनी “खेची” मारायला सुरुवात केली की फिरकी पकडणाऱ्याला भराभर गुंडाळायला लागायचं. गुरु जर ‘आक्रमक’ असेल तर “खेची” मारायचा. आणि जर ‘मवाळ’ असेल तर “ढील” द्यायचा. “खेची” मारणारा असेल तर “बारीक मांजा” वापरायचा आणि “ढील” देणारा असेल तर “जाडा मांजा”. गुरु जर कंजूस असेल किंवा कडकी लागलेला असेल तर जाड्या मांजाने, कापलेले पतंग लटकावून आणायचा आणि कधी कधी त्या लटकावलेल्या पतंगातून शिष्याला बक्षीस असायचं. पण आपल्याला साला, जाड्या मांजात किंवा लटकवण्यात कधीच इंटरेस्ट नसायचा. पतंग आकाशात गेल्यावर एकतर कापाकापी करा, नाहीतर स्वतःचा पतंग घालवून तरी टाका, पण नुसता उडवत राहायचं नाही. जर गुरुचं उडवणं रटाळ असेल, तर कधी कधी वैतागलेला शिष्य स्वतःच सुमडीमध्ये हाताकडेच मांजाला ब्लेड मारायचा. मग बसू देत गुरुजी बोंबलत. आमच्या वाडीत एक वामन म्हणून जबरदस्त आक्रमक गुरु होता. तो खेचायला लागला की सगळे नुसते बघत बसायचे. एकदा तर पठ्ठ्याने एकाच वेळेला २३ पतंग कापले. म्हणजे जी त्याने खेचायला सुरुवात केली ती २३ पतंग कापले गेल्यावरच थांबला. तर अशा गुरुकुलात वाढल्यावर मग काय होणार? संक्रांतीच्या २-३ दिवस अगोदर डोंगरीला (भेंडीबाजार, इमामवाडा) अख्खी गॅंग घेऊन जायचो (ही प्रथा ऐन १९९३ च्या दंगलीत सुद्धा कटाक्षाने पाळली गेली, हे विशेष), बारीक मांज्याच्या “फिरक्या” आणि पतंगांच्या “कोडी” आणायचो. त्या पतंगाची नावं तरी किती? चटऱ्या, बाणछाप, तिरंगी, दोन डोळेवाला, सुरती, तेल्कटी, चंदेरी, मेणबत्तीछाप, चौरंगी, अभ्रकी…कसलीच ददात नाही. संक्रांतीच्या आदल्या रात्री उशीरापर्यंत पतंगांना “कण्या” बांधत बसायचो. रात्री २-३ वाजता झोपायला जाउन मग ५ वाजता उठायचो. आम्ही दोघे-तिघे तर आंघोळ वगैरे करून पहाटे साडेपाचलाच गच्चीवर हजर असायचो. सकाळच्या काळोखात समोरच्या चाळीतील “खिडक्या” बघणं हे अपरिहार्य असलं तरी मनोरंजकसुद्धा होतं. ;-) ६.३० वाजेपर्यंत सगळ्या गच्च्या फुल व्हायच्या. प्रकाशही मुबलक पडलेला असायचा. साधारण ९ च्या सुमारास मोठ्ठे स्पीकर चालू व्हायचे. “नवीन पोपट” उडायचे, “बिलन”च्या नागिनी निघायच्या, ग्लासेस आणि पाय थीरकायचे. लोकं पतंग उडवता उडवता डान्स करायचे आणि डान्स करता करता उडवायचे. आम्ही आपले थोडा वेळ गच्चीत पतंग उडवून गर्दी वाढायला लागल्यावर सरळ कौलावर जाऊन बसायचो. या “कौलां”चं खरच कौतुक वाटतं. एक पाय कौलाच्या एका बाजूला, तर दुसरा पाय दुसरया बाजूला. अशा अवतारात पतंग एकट्याने उडवायचा. तेही फिरकी स्वतःच्या पायात टाकून. हे सगळं एखाद्या लष्करी शिक्षणाला लाजवेल असं होतं. गिरगावातली मुलं ही अशी रफ-अन-टफ होतात. हे सगळं आता आठवलं की अंगावर काटा येतो. पण तेव्हा मात्र कसलीही तमा नव्हती. आणि त्या कौलांनीही कधी आम्हाला दगा दिला नाही. आम्ही एवढे अक्षरश कौलावरून धावायचो आणि कौलं फोडायचो, पण कधी घसरलो नाही. ना कधी कौलांनी कसली तक्रार केली की ना कधी लोकांनी. त्या उलट दिवसभर तिळाच्या लाडवांची रसद पुरवायचे काम कौलाखालील रहिवासी बिनबोभाटपणे आणि नियमितपणे करायचे. मग तेच तिळगुळ खावून गोड-गोड बोलायच्या ऐवजी आजूबाजूंच्या “दुश्मन” गच्च्यांच्या आया-बहिणी दिवसभर काढत कसा दिवस मावळायचा हे कळायचंच नाही. पहाटे ५.३० वाजता पकडलेली गच्ची रात्री ८ वाजेपर्यंत सुटायचीच नाही. काळोख झाला की मग मात्र थकवा जाणवायचा. मांजाने कापलेल्या रक्तबंबाळ हाताच्या वेदना ठणकू लागायच्या आणि मग आम्ही कौलावरच आडवे व्हायचो…परत अंधारात समोरच्यांच्या घरात डोकावत. तर अशी ही “कौलां” वरची “मुलांची संक्रांत”. आयुष्यात कधीही न विसरता येणारी. आणि यंदाची संक्रांत तर कदाचित चाळीतील शेवटची. गिरगावातील चाळ-संस्कृती नामशेष झाल्यावर कौलंही नामशेष होणार. म्हणजे एका अर्थाने ही टॉवर-संस्कृती ही कौलांवर संक्रांतच आणणार. पण मनातल्या कप्प्यांमध्ये आणि आठवणीतल्या गप्पांमध्ये “गिरगावातली संक्रांत” ही कायम अमरच राहणार… हे वाचून स्मरणरंजनात गुंग झालो... .मी हे सारे अनुभवले आहे.. शोले च्या संवादांची रेकॉर्ड त्यादिवशी अनेकदा ऐकली आहे. फाटका पतंग चिकटवायला म्हणजे patch लावायला शिळा भात वापरायचो.. काही expert लांबवर पतंग बदवायचे..आमचे आधीच काटले जायचे..फिरकी धरायला आम्हाला गिऱ्हाईक करायचे आणि बक्षीस म्हणून लांबवर बदवलेला पतंग दोन मिनिटे हातात मिळायचा.. तो झेपत नसे तो गोता खायचा .. expert लोक आमच्या हातुन घेऊन त्याला स्थिर करायचे.. पण कधी ओरडले नाहीत ..एका हातात फिरकी धरून दुसऱ्या हाताने पतंग उडवणा-या लोकांबद्दल आदर वाटायचा. असो. गेले ते दिवस उरल्या फक्त सुखद आठवणी...