हे तर शंभर वर्षांपूर्वीचे फ्लिपकार्ट!

पुनश्च    संकलन    2019-12-13 10:00:45   

विश्वास बसणार नाही परंतु फ्लिपकार्ट, इ-बे किंवा अॅमेझॉनसारखी विक्री व्यवस्था १९२२ सालीही अमेरिकेत अस्तित्वात होती, तिला Mail order business म्हणंत. असा व्यवसाय करणाऱ्या ‘सिअर्स, रोबक आणि कंपनी’ कंपनीत १३ हजार कर्मचारी होते आणि तिचा कारभार  वर्षाला ५० ते ६० कोटी रुपयांचा होता.  कुठलीही कल्पना नवीन नसते, तर ती जुन्याच एखाद्या कल्पनेचा नवा आविष्कार असतो, हे आपल्याला हा लेख वाचला की लक्षात येते- हा लेख किर्लोस्कर खबर मधून घेतलेला आहे.  कारखान्याच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या हेतूने १९२० साली शंकरराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर खबर नावाने वृत्तपत्रिका सुरू केली. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे तत्कालीन स्वरूप होते. १९२९ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सूचनेवरून किर्लोस्कर खबर हे नाव बदलून या नियतकालिकाचे नाव किर्लोस्कर असे ठेवण्यात आले. पुढे किर्लोस्करने सामाजिक-साहित्यिक मासिक म्हणून लौकीक मिळवला.[su_divider top="no"]

मूळ शीर्षक- जुलियस रोझनवाल्ड | अंक- किर्लोस्कर खबर १९२२

अमेरिका हे मानवकृत आश्चर्याचे माहेरघर आहे. हिंदुस्थानाच्या पाताळी वसलेल्या या खंडांत कोणती गोष्ट चमत्कारिक नाहीय़ ? येथील माणसे आणि त्यांनी घडवून आणिलेल्या गोष्टी जर प्रवासी लोकांच्या नजरेंत आल्या नसत्या अगर त्यांचे प्रत्यक्ष देखावे फोटोच्या रूपाने अगर सिनेमा चित्रांतून पाहण्यास मिळाले नसते तर त्यांची गणना अद्भुतरम्य काल्पनिक गोष्टींत झाली असती; परंतु सध्यां दळणवळणाची साधने इतकी विपुल झाली आहेत व ती इतकी स्वस्त आहेत की, को ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


किर्लोस्कर , उद्योग , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. marale

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख

  2. marale

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान

  3. amarsukruta

      5 वर्षांपूर्वी

    खूपच छान!

  4. Meenalogale

      5 वर्षांपूर्वी

    नाविन्यपूर्ण माहिती.लेख आवडला.

  5. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    साधारण १९८५ च्या दरम्यान Otto Burlington या नावाचे एक मासिक येत असे. मी त्याचा subscriber होतो. भारतीय बाजारात न मिळणाऱ्या अजब उत्पादनांचे फोटो त्यात असत. त्याखाली त्याचा कोड नंबर आणि किंमत असे. मनी ऑर्डरने पैसे पाठवून ते उत्पादन घरी मागवता येत असे. मी अनेक वस्तू मागविल्या होत्या..

  6. किरण भिडे

      5 वर्षांपूर्वी

    लेखावर लेखकाचे नाव नव्हते...

  7. harshadp

      5 वर्षांपूर्वी

    khup bhari.. who is the writer of this article ?

  8. किरण भिडे

      5 वर्षांपूर्वी

    हा शंभर वर्ष जुना कन्सेप्ट आहे किरण जी. तेव्हा पोस्टच असणार...

  9. kiranshelke

      5 वर्षांपूर्वी

    नमस्कार. सध्याच्या काळात अमेरिकेत पोस्टावर विश्वास ठेवणारे आहेत हीच अचंबित करणारी गोष्ट आहे.

  10. shripad

      5 वर्षांपूर्वी

    छान! एक कोटी केल्यावाचून राहवत नाही. उत्कृष्ट चहा करण्याचा सेट की चहा करण्याचा उत्कृष्ट सेट? ???



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen