'भीमसेन हा गुणी असला तरी घराण्याची मुख्य गायकी तत्परतेने सांभाळण्यात काहीसा चुकारपणाच करतो. तो नादी आहे. ह्यांच्यातले हे चांगले वाटले, त्यांच्यातले हे चांगले वाटले, ते ते घेऊन घराण्याच्या गायकीवर जोडून देतो.' 'टिळकांचा माझा संबंध कधीच आला नाही. शिवाय टिळक हे गायनाचे शौकी नव्हते किंबहुना त्यांना गायनाची अरुची असे.' 'बाबलीबाई ही नथ्यनखांची शिष्या अतिशय तयार होती. ती अंगाने एखाद्या पहिलवानासारखी जाडजूड भव्य होती आणि बैठकीच्या वेळी एक घागर भरून कॉफी पीत असे...' सवाई गंधर्वांनी सांगितलेल्या अशा किश्श्यांची ही रंगतदार मैफल आहे....य.न. केळकर यांनी सवाई गंधर्वाच्या मुलाखतीमधून रंगवलेली ही मैफल आहे १९५२ सालची! सवाई गंधर्वांची अखेरची मुलाखत अंक – सह्याद्री, नोव्हेंबर १९५२ दि. १३-५-५२ ला दुपारी २ वाजता श्री. वाडीकर यांजबरोबर सवाई गंधर्वांच्याकडे गेलो होतो. दोन तीन तासांपर्यंत गप्पागोष्टी झाल्या. सुमारे ३।४ महिन्यांपूर्वी मी मुद्दाम त्यांचेकडे गेलो होतो. पण त्या वेळी त्यांजकडे दुसरे दोघे तिघेजण आल्यामुळे निवान्तपणे बोलता आले नाही. शिवाय ती आमची पहिलीच भेट होती. त्याआधी त्यांचा माझा साक्षात परिचय किंवा बोलणे असे कधीच झालेले नव्हते. मी त्यांच्या गायनाचा एक नितांत भक्त आहे, याची माहिती त्यांच्या ज्युबिली प्रसंगी मी त्यांना एक खाजगी पत्र लिहिले होते व त्याला त्यांनी स्मरणपूर्वक उत्तर पाठविले होते, त्यावरून त्यांना होतीच. ते माझे पत्र असे— श्री. रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांस – सा. न. वि. वि. आपला माझ्याशी बिलकूल परिचय नाही म्हणून आपण घोटाळ्यांत पडाल, परंतु माझा मात्र आपल्याशी दृढ परिचय आहे खास! प्रजेतील प्रत्येक माणूस र ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
nvjoshi
5 वर्षांपूर्वीya apratim lekhabaddal anek aabhaar
purnanand
5 वर्षांपूर्वीअडूसष्ट वर्षापूर्वी लिहिलेला लेख वाचून खूपच छान माहिती मिळाली. त्याकाळी शिकण्याकरिता काय काय सहन करावे लागत असे याचे वर्णन अनेक गायकांनी लिहिलेल्या पुस्तकात वाचायला मिळाले होते.पण सवाई गन्धर्वान्वरील असे मुलाखत वजा कथन प्रथमच वाचायला मिळाले सुंदर माहिती बद्दल आभार.
[email protected]
5 वर्षांपूर्वीअप्रतिम
[email protected]
5 वर्षांपूर्वीवाह सुंदर लेख....