लग्नसमारंभ ...धार्मिक तमाशा !


नवऱ्या मुलाचे तर अखंड लग्नात इतक्या वेळा पाय धुतले जातात, की कंटाळा येऊन एखादा नवरा मुलगा ‘आता जरा बदल म्हणून, दुसरा एखादा अवयव धुवा बुवा!’ असं कसं म्हणत नाही ह्याचंच आश्चर्य वाटतं. सीमान्तपूजन, वराचं वधुगृह आगमन, मधुपर्व अशा अनेक विधींमध्ये वर आपले पाय वरचेवर धुऊन घेत असतो’. ‘लग्नाच्या पंगतीत ‘विहिणबाई सांभाळा हो— दिला पोटचा गोळा’ हे आणि ‘ओटीत घातली मुलगी विहिणबाई— सांभाळ करावा हीच विनंती पायी’ (जय गदिमा!) ही गाणी एका उत्साही बाईनं म्हटली म्हणून जिचं लग्न होतं अशी एक माझी डॉक्टर मैत्रीण जाम वैतागली होती. तिचं म्हणणं असं होतं की मी चांगली एम.बी.बी.एस्. झालेली डॉक्टर आणि ‘माझा सांभाळ करा’ म्हणजे काय करा?’ वरील दोन्ही उतारे प्रस्तुत लेखातून घेतले आहेत, हे सांगितले तर पुरे होईल. आपल्या विवाहविधींमध्ये, सबंधित उपचारांमध्ये ठासून भरलेले हास्य सदर लेखकाने इतके अचूक हेरले आहे, की पोट धरुन हसणे म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. हा लेख तब्बल चाळीस वर्षांपूर्वी स्त्री मासिकांत प्रसिद्ध झाला होता, यावरुन आपण तेंव्हा किती सहिष्णू होतो, किती मोकळेपणानं आपल्या संस्कृतीकडे पाहू शकत होतो हे लक्षात येते...वाचा आणि हसा! अंक – स्त्री, जुलै १९७९ फार वर्षांपूर्वीची नाही, १९७९ सालची गोष्ट आहे ही. त्या सालच्या एका प्रख्यात दिवाळी अंकात एका तितक्याच प्रख्यात लेखक कम् प्रख्यात छायाचित्रकारानं एक लेख स्वतःच्या (म्हणजे स्वतः टिपलेल्या) रंगीत छायाचित्रांसह प्रसिद्ध केला होता. ह्या रंगीत छायाचित्रांत कोणती बरं रोमहर्षक दृश्यं होती? एक धोतर नेसलेला प्रौढ पुरुष आणि अंगाला चिपकलेली साडी नेसलेली प्रौढ बाई उघड्यावर आंघोळ करत होत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , स्त्री , उपहास

प्रतिक्रिया

  1. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    काही प्रथा आजही आहेतच . मी स्वतः लग्नसमारंभात निवेदन करत असतो तेव्हा काही हास्यास्पद प्रथांचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही

  2. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    हा लेख दूरदर्शन मालिका निर्मात्याने वाचला तर , ह्यावर दहा बारा भाग बनवेल आणि आचरट प्रथेचे glorification करेल हे नक्की... कारण हल्ली राष्ट्रवाद वगैरे शिकवायचे धडे , पुस्तक वाचून त्यावर मनन करून मग मत बनवायचे, या पद्धतीचे ना राहता माध्यमांची शिकवणी लावून क्षणात आत्मसात केले जातात. अरुण सप्तर्षी या लेखकांना सादर प्रणाम ...

  3. aghaisas

      5 वर्षांपूर्वी

    लेख ठीक आहे. बऱ्याच गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत हा मतितार्थ थोड्या विनोदी ढंगाने लिहिला आहे.

  4. patankarsushama

      5 वर्षांपूर्वी

    आपल्या कालबाह्य झालेल्या प्रथांवर छान प्रकाश टाकला आहे

  5. shripad

      5 वर्षांपूर्वी

    हा लेख वाचून सप्तर्षींची कीव आली. माझ्या लहानपणापासून मी अनेक लग्ने पाहिलेली आहेत (माझ्या स्वतःच्या लग्नासह) पण यातील कुठल्याही लग्नात सप्तर्षी म्हणतात तसा किळसवाणा प्रकार पाहिला नाही. आमच्याकडील वरिष्ठ मंडळी सुसंस्कृत आणि सुज्ञ असल्याने ते आम्हाला आधीच कुठेतरी पिटाळून देत असावेत. असे विधी रस्त्यावर झाल्याचे तरी माझ्या ऐकिवात पहिल्यांदाच आले आहे. अनेक गरिबातील गरीब लोक देखील अंघोळीचा प्रसंग घरातील न्हाणीत करतात. तसेच चावून भुगा झालेला खोबऱ्याचा कीस अन चुळा जोडीदाराच्या अंगावर कुठे थुंकाव्या याकरता प्रत्येकाने आपापला तरतमभाव वापरल्याचे मी पाहिले आहे. सप्तपदीतील मंत्रांमध्ये जरी आठ-दहा मुले मागितली असतील तरी लग्नानंतर ते गांभीर्याने घेणारी पाच जोडपी सप्तर्षींनी दाखवून द्यावीत. मग शासनाचे लक्ष निश्चितच वेधावे. ज्यांना आत्ता  नातवंडे आहेत अशा पिढीत हे होते पण आता तसे औषधालाही मिळणार नाही.  "सांभाळ करा" या शब्दाचा अर्थ एखाद्या लहान बाळाप्रमाणे सांभाळ करा असा नाही हे तर कोणालाही कळेल. माणूस कितीही वयाचा का असेना, त्याची काळजी घेणारे कोणीतरी असले पाहिजे असे सर्वांना वाटते. मग ती काळजी एखाद्या लहान बाळाची काळजी करतो तशी असते का?  एकंदरीतच हा लेख म्हणजे विवाह संस्कारातील काही पद्धतींचे विकृतीकरण करणारा आहे. 



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen