सत्यकथेत कथा प्रसिद्ध होणं ही एकेकाळी प्रतिष्ठापात्र लेखक होण्याची कसोटी होती. त्या कसोटीला उतरलेले अनेक लेखक पुढे साहित्यासह इतरही अनेक प्रांतात मोठे झाले. रविराज गंधे हे आपल्याला दूरदर्शनवर 'अमृतवेल'सह इतरही अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांचे निर्माते, लेखक म्हणून माहिती आहे. १९७९साली सत्यकथेत प्रसिद्ध झालेली त्यांची ही कथा...वेदना सहवेदना आणि भावनिक तिढ्याचा एक अनोखा अनुभव देणारी-- ही कथा तुम्ही इथून ऐकूही शकाल. [audio mp3="https://bahuvidh.com/wp-content/uploads/2020/01/03-patient-1.mp3"][/audio] ********** अंक – सत्यकथा, एप्रिल १९७९ १ जानेवारी १९७८. बूथ हॉस्पिटलमधील नर्सनं जुनं रजिस्टर क्लोज केलं अन नव्यावर तारीख घातली. दरवर्षीप्रमाणे तिनं पहिल्यांदा अरुण देशपांडेचं नाव फॉरवर्ड केलं. एजः २७, सेक्सः मेल, डायग्नॉसिसः कॅन्सर, डेट ऑफ अॅडमिशनः १ जानेवारी १९७५. “तोंडावर पांघरूण घ्या साहेब.” डी.डी.टी. मारणाऱ्या माणसानं अरुणला फर्मावलं. आज एक तारीख, म्हणजे करमणुकीचा दिवस. एकजात सारे सरकारी नोकर झाडून हजेरी लावणार - न्हावी, भंगी, धोबी, व्हिटॅमिनच्या गोळ्या देणारा माणूस. आजचा दिवस फारच गडबडीचा. डी.डी.टी. च्या उग्र वासाबरोबर अरुणच्या आठवणी जाग्या झाल्या. तो ज्या दिवशी इथं आला त्या दिवसाची आठवण करून देणारा हा विषारी पांढरा वास, गेले चाळीस महिने, बरोबर एक तारखेला एखाद्या घेणेकऱ्यासारखा विषारी फूत्कार टाकीत येत असे अन् पाहता पाहता साऱ्या दिवसावर पांढरी कळा पसरत असे. पांढऱ्या भिंती, पांढरी चादर, पांढरी खाट, नर्स पांढऱ्या, डॉक्टर पांढरे...सारी कफनयात्रा पाहता पाहता त्याचा चेहरा पांढरा पडे...ह्या पांढऱ्या धुक्यात कुठेतरी निळ्या फुलांचा गच्च त ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .