सिनेमासृष्टीतील माझे अनुभव

पुनश्च    राजा परांजपे    2020-02-01 06:00:51   

राजा परांजपे यांना आपण ओळखतो 'लाखाची गोष्ट', 'पेडगावचे शहाणे', 'जगाच्या पाठीवर' अशा उत्तमोत्तम चित्रपटांसाठी, त्यांच्या अभिनयासाठी. असा प्रसिद्ध कलावंत जेंव्हा चित्रपटसृष्टीतील आपल्या अनुभवांविषयी लिहितो तेंव्हा तो साहजिकच आपल्या आठवणी चघळीत मोठेपण मिरवणार अशी आपली अटकळ असते. १९५१ साली राजा परांजपे यांनी लिहिलेल्या या लेखात मात्र आठवणींचा सूर आळवलेला नाही. कर्तृत्वाची शक्यता संपल्यावर माणूस अशा आठवणीत रमतो म्हणतात, हा लेख लिहिला तेंव्हा राजा परांजपे कर्तृत्वाच्या पायऱ्या चढण्याची तयारी करत होते.  कारण  पेडगावचे शहाणे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२) आणि जगाच्या पाठीवर (१९६०) हे राजाभाऊंचे तिन्ही श्रेष्ठ चित्रपट हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आलेले आहेत. लेख वाचताना, राजा परांजपे यांना असे काही मोठे आपल्या हातून घडणार आहे याचा अंदाज आला असावा याची खात्री पटते-**********

अंक – युगांतर, दिवाळी १९५१

मी एक साधासुधा कलावंत आहे. विवेचनात्मक लेखन हा काही माझा व्यवसाय नव्हे. आपल्या कलागुणांच्या जोरावर कलाप्रेमियांची करमणूक करावी आणि जातांजातां चारदोन उपदेशाच्या गोष्टी हळूच सांगता आल्या तर पहाव्या ही मनातील इच्छा आहे. पटाईत लेखकांच्या क्षेत्रावर अतिक्रमण करण्यास मनाला संकोच वाटतो. कारण लेखनाच्या क्षेत्रात मी अनभिज्ञ आहे. तथापी ज्या व्यवसायांत मी हिरीरीने काम करतो आहे त्या व्यवसायाबद्दल आपण स्वतःच काहीतरी विचार मांडण्याची वेळ आतां आली आहे असे वाटू लागल्यामुळेच हा अल्पसा प्रयत्न मी करीत आहे व त्याच दृष्टीने या लेखाकडे वाचकांनी पहावे अशी प्रार्थना आहे.

‘सिनेसृष्टीतील माझे अनुभव’ हा माझ्या लेखाचा विषय आहे. या क्षेत्रांतील कलावंतांना कोणकोणत्या प्रकारचे अ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


अनुभव कथन , युगांतर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.