fbpx

असा आहे आमचा विदर्भ

माणूस ज्या भूप्रदेशात राहतो त्यात त्याचे मन आणि मानस कायम गुंतलेले असते. मातीला माता म्हणतात तेही त्यामुळेच. आपल्या प्रदेशाची अस्मिता, ओळख कायम राहावी, प्रगती व्हावी याचा ध्यास माणसे सतत घेतात आणि त्यात अडचणी येत असतील तर त्यातून  स्वतंत्र होण्याची आंदोलने सुरु होतात. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला साठ वर्षे होत आली आहेत, तरीही विदर्भातून अजूनही अशा आंदोलनांच्या हाका अधून मधून येत असतात, त्याची कारणे इतिहासात दडलेली आहेत. ती समजून घेताना विदर्भाचा इतिहासही समजून घेतला पाहिजे, वऱ्हाड आणि उर्वरित विदर्भ कसे वेगळे आहेत हेही तपासून पाहिले पाहिजे. विविध भूप्रदेशांच्या इतिहासाच्या वाटा पुसत जाणाऱ्या ‘स्थललेख’ मालिकेतील हा लेख आहे. यातून विदर्भाचा गतकाल, सांस्कृतिक ऐश्वर्य आणि भौगोलिक स्वभाववैशिष्ट्यांचा अतिशय रंजक परिचय होतो. ‘चित्रमय जगत’च्या  जानेवारी १९५७ च्या अंकात हा लेख प्रथम प्रसिद्ध झाला होता. म्हणजे तेंव्हा हा भूप्रदेश, १ नोव्हेंबर १९५६ रोजी अस्तित्वात आलेल्या मराठी व गुजराती भाषिकांच्या विशाल द्वैभाषिक राज्याचा भाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा गजर तेंव्हा हवेत दुमदुमत होता.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. संघाचे द्वितीय सरसंघचालकांचे नाव `गोळवलकर’ हवे, ते चुकून `गोवळकर’ पडले आहे.

  2. स्वतंत्र महाराष्ट्राचा अविभाज्य प्रमुख भाग आणि नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळूनही दुर्दैवाने साठ वर्षानंतर आजही विदर्भाची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही . कदाचित् राजकीय व औद्योगिक नेतृत्व कमी पडत असावे . फडणवीस फार सज्जन होते , मुंबई – पुण्याच्या लोकांशी सामना करायला नितीनजी हवेत .

Leave a Reply

Close Menu