एक ‘भाषांतर’ अनुभव

पुनश्च    डॉ. अनघा भट    2017-11-25 06:00:05   

अंतर्नाद : जुलै २००६ लेखाबद्दल थोडेसे : यावेळेचा हा 'अनुभव कथन' सदरातील लेख भाषांतर तज्ञ डॉ. अनघा भट यांचा आहे. लेखिका स्वतः रशियन भाषेच्या तज्ञ आहेत आणि पुणे विद्यापीठात रशियन एम.ए. साठी भाषाविज्ञान व भाषांतरसिद्धान्त हे विषय त्या शिकवतात. बारामतीला झालेल्या द्राक्ष बागायतदारांच्या एका कार्यक्रमाला त्या दुभाष्या म्हणून उपस्थित होत्या. तिथले अनुभव त्यांनी या लेखातून मांडले आहेत जे मुळातून वाचण्यासारखे आहेत. पुनश्चमध्ये अनुभव हे सदर देण्यामागचा हेतू एक सर्वस्वी वेगळं आयुष्य वाचकासमोर आणण्याचा आहे. या लेखातून तो १००% साध्य होतोय. जाता जाता...आपण सहज म्हणून जे इंग्रजी शब्द वापरतो त्यांना लेखिकेने किती छान पर्यायी मराठी शब्द वापरलेत पाहा. अंतर्नाद, जुलै २००६ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** काही वेळेला काही घटना अगदी अनपेक्षित अशी अनुभवसमृद्धी देऊन जातात. काही महत्त्वाचे अशा तऱ्हेने समोर येते की वाटू लागते,  अरे ! ही शक्यता आपल्या कधी लक्षातही आली नव्हती !’ माझ्या बाबतीत असेच काहीसे घडले. दि. ९, १० व ११ फेब्रुवारी २००६ रोजी बारामती येथे होणाऱ्या ‘द्राक्षे आणि द्राक्षावरील प्रक्रिया’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात मी दुभाष्या म्हणून काम केले. ग्रेप ग्रोअर्स फेडरे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , भाषा , अनुभव कथन , करिअर

प्रतिक्रिया

  1. मोहिनी पिटके

      7 वर्षांपूर्वी

    सर्जनशील कलावंताचे प्राक्तन ऑर्वेलच्या वाट्यालाही आले होते . हे वेदनामय एकटेपण कदाचित त्यांच्या निर्मितीची प्रेरणा ठरत असेल . कारण श्रेष्ठ साहित्य अशा वेदनेतूनच जन्म घेते
    अस्वस्थ करणारा लेख
    लेखन व्यवहारासंबंधीचा लेख अगदी वास्तव आहे .
    पूर्वीचे वृत्तपत्रीय लिखाण आजच्या वृत्तपत्रीय लिखाणासारखे अल्पजीवी नव्हते . दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लेखनावर लेखकाचा चरितार्थ चालायला हवा . आपल्याला अनेक प्रतिभावंतांची अशी उदाहरणे माहित आहेत .
    बोरकर देखणेपणाचा नवा अर्थ सहजपणे उलगडून दाखवतात
    तेच डोळे देखणे जे आकाशव्यापी दु: खाला कवेत घेतात . हे देखणेपण खरे श्रेयस आहे .

    संगमेश्वर हा रवींद्र पिंगे यांचा झुळझुळणारा लेख वाचला .
    एकाद्या स्थानाचे मनोहारी वर्णन करतानाही तिथले वास्तव वाचकांपुढे ठेवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत .

    अनुवाद ही एक महत्वाची सर्जक क्रिया आहे .

  2. विनय सामंत

      7 वर्षांपूर्वी

    छान!!

  3. स्मिता पेठे

      7 वर्षांपूर्वी

    अप्रतिम.. ? पुनश्च चा हेतू साध्य करणारा लेख. ज्या पोटतिडकीने डॉ. अनघा यांनी अनुभव लिहिला आहे आणि मत मांडली आहेत, तसं घडणं आवश्यक आहे..

  4. Shyam

      7 वर्षांपूर्वी

    Excellent

  5. natujaya

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय उत्तम माहिती . आभार .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen