समाजाचा शत्रू

पुनश्च    विजय पाडळकर    2017-12-06 06:00:12   

अंतर्नाद नोव्हें-डिसें २०१४

लेखाबाबत थोडेसे : गणशत्रू, १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला हा सत्यजित राय यांचा चित्रपट. गणशत्रू म्हणजे समाजाचा शत्रू. विजय पाडळकर यांनी चित्रपटाचा रसास्वाद घेताना तो मूळ ज्या नाटकावरून बेतलाय त्या 'enemy of the people' चाही आपला परिचय करून दिलाय. हे म्हणजे एक पे एक फ्री च की. लेख जरा मोठा आहे पण दम धरून शेवटपर्यंत वाचलात तर नक्की समाधान देईल.

नोव्हें-डिसेंबर २०१४ च्या अंतर्नाद अंकात प्रसिद्ध झाला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च...

**********

नाटक व चित्रपट रसास्वाद: An Enemy of the People आणि  गणशत्रू

माझ्या वडिलांचे शिक्षण उर्दूमधून झाले होते. त्यामुळे बोलता बोलता ते मध्येच एखादा उर्दू शेर सांगत. असेच एकदा निवडणुकीच्या काळात ते म्हणाले होते, जम्हूरीयत (लोकशाही) इकतर्जे हुकूमत है जिस में / बंदो को गिना जाता है, तोला नही जाता.’

ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्याकाळी भारतात नुकतीच लोकशाही रूजू लागली होती. सुरुवातीचे कौतुकाचे दिवस संपले होते. आणि लोकशाहीतील उणीवांची थोडीफार जाणीव लोकांना होऊ लागली होती. आज, पन्नास वर्षांनंतर लोकशाहीमधील दोष अत्यंत ठळकपणे जाणवत आहेत; पण त्याचबरोबर हेही जाणवत आहे, की लोकशाहीशिवाय पर्याय नाही. विचार करणाऱ्या माणसाच्या मनात आज हे द्वंद्व सुरूच आहे.

‘नायक’ हे सत्यजित राय यांचे जीवन आणि चित्रपट यांचा वेध घेणारे पुस्तक लिहित असता ‘गणशत्रू’ या त्यांच्या चित्रपटाचा विचार करताना इब्सेनचे ‘An Enemy of the People’ हे नाटक पुन्हा एकदा वाचण्यासाठी घेतले होते. ते वाचताना मनात आजच्या समाजजीवनाचे विचारच पु ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


अंतर्नाद , चित्रपट रसास्वाद , नाटक रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.