लेखाबाबत थोडेसे : 'अर्थकारण' या सदरात सीए उदय कर्वे यांच्या 'अर्थसाक्षरता' मालिकेतला दुसरा लेख समाविष्ट केला आहे. आरोग्यसंस्कार मासिकातील ही मालिका त्यावेळी खूप वाचकांना पसंद पडली होती. या लेखात कर्वेसरांनी 'कर्ज' या विषयाचा त्यांच्या टिपिकल 'पुणेरी' कर्वे शैलीत समाचार घेतला आहे. कर्ज ही संकल्पना सोप्या तऱ्हेने उलगडून सांगत असता यातील जोखीम थोडक्यात व मुद्देसुदपणे मांडली आहे. आरोग्यसंस्कार अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... पैसे भाड्याने घेणे (कर्ज काढणे) आजकालच्या काळात ”लोन” असा शब्द टाइप करून इंटरनेटवर ”सर्च” चा हुकूम दिला तर असंख्य बँका, पतपेढ्या, बिगर बँकिंग पतसंस्था, खाजगी मालकीच्या कंपन्या यांची पानेच्या पाने भरून माहिती येते. आणि त्यानंतर तुम्हांला अनेक इमेल्स येणं सुरू होतं, जणू तुम्हांला कर्ज देण्यासाठी सारं विश्व आतुर झाले आहे. वर्तमानपत्रातही कर्ज देणार्या खाजगी कंपन्यांच्या आक्रमक जाहिराती असतात ज्यात आम्ही किती दिवसांत, नव्हे किती तासांत कर्ज वितरण करतो हे सांगितलेले असते. त्यात टोल फ्री फोन नंबर, अमुक शब्द अमुक मोबाईल वर फक्त एस्. एम्. एस् करा. ”मिस्ड कॉल” द्या. अशी अनेक प्रेमळ आवाहने असतात. अशा आक्रमक जाहिरातींचे विचित्र परिणाम आपणां सर्वांवर होत असतात. माझ्या सी. ए. च्या व्यवसायातील एक बर्यापैकी ”कॅश रीच” व खुपसा प्रामाणिक अशील (क्लायंट) एकदा निरनिराळ्या बँका व फायनान्स कंपन्यांकडून उपलब्ध असलेल्या ”कारलोन्स्” च्या तपशिलाचा एक तक्ताच करून घेऊन आला व म्हणाला ”जरा बघून घ्या, व उद्यापर्यंत सांगा यांपैकी कोणाकडून नवीन कारसाठी कर्ज घेऊ.” मी ते सर्व बघितले, त्या ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
सुधन्वा कुलकर्णी
7 वर्षांपूर्वीअर्थसंस्कार-कर्ज हा लेख गेल्या वर्षीचा(९ डिसेंबर २०१७) असल्याने तुमच्या चालू वार्षिक वर्गणीत तुम्हाला तो वाचता येत नाहीये.
mkkelkar
7 वर्षांपूर्वीवर्गणी भरली आहे, तरी सुद्धा लॉगिन करून, हा लेख पूर्ण वाचता येत नाहीये
VijayGokhale
7 वर्षांपूर्वीछान.
Patharkar Satish
7 वर्षांपूर्वीRealy
prashasnt
7 वर्षांपूर्वीGood
avthite
8 वर्षांपूर्वीVery insightful..