अनंत अंतरकर

पुनश्च    शि द फडणीस    2017-12-01 10:22:07   

अंक:- मनोहर ; वर्ष:- जुलै १९६६ सहा ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट. भर दुपारची वेळ. बारा-चौदाशे मैलांचा प्रवास करून मी शरीराने व मनानंही थकून गेलो होतो. का कोण जाणे, दोन-तीन दिवस मन बेचैन होतं. डोकं नाना विचारांनी सुन्न झालं होतं. तशातच प्रवासाहून मी घरी आलो तो अंगात दोनपर्यंत ताप घेऊनच आणि आल्यावर कळलं- ‘अंतरकर गेले!’ कानांवर विश्र्वासच बसेना. आता डोकं अधिकच बधिर झालं. हा आघात फारच विलक्षण व दुर्दैवी होता. ‘अंतरकर गेले!’ या दोन शब्दांनी एकदम केवढी मोठी पोकळी जाणवली.

हे सारं फार अनपेक्षित होतं. दिल्लीहून आल्यावर मी अंतरकरांना पुन्हा भेटायला जाणार होतो. त्यांच्या ‘मोहिनी’वरील मुखपृष्ठ दिल्लीतल्या प्रदर्शनात झळकणार, त्याची सर्व हकीकत मी त्यांना सांगणार होतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच ‘हसरी गॅलरी’ दिल्लीला नेणार होतो. कितीतरी वर्षांचे आमचे ऋणानुबंध. त्यांच्या मासिकामुळे आम्ही दोघं जितक्या जवळ आलो होतो अन्‌ इतक्या जवळ येऊनही त्यांच्या अखेरच्या क्षणी मात्र मी इतका दूर होतो.

[caption id="attachment_3914" align="alignleft" width="229"] अनंत अंतरकर[/caption]

किती वर्षे झाली? वीस वर्षापूर्वी नव्यानंच निघालेल्या ‘हंस’ मासिकातर्फे एक हास्यचित्रस्पर्धा जाहीर झाली होती. तिजमध्ये मी भाग घेतला. आमची ओळख अशी झाली. अंतरकर नवीन मासिक काढणारे संपादक आणि मी स्कूल ऑफ आर्टसचा विद्यार्थी. म्हणजे तसे आम्ही दोघंही अगदी प्राथमिक अवस्थेतच होतो. अंतरकर मला त ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मनोहर , अनुभव कथन , व्यक्ती विशेष , मृत्यूलेख

प्रतिक्रिया

  1. khadikarp

      7 वर्षांपूर्वी

    शि. द. फडणीस यांचे ही वेगळे रुप कळले. वाचून आनंद वाटला.

  2. राजेश कदम

      7 वर्षांपूर्वी

    फारच छान आणि सुंदर लेख आहे. तुमचा आभारी आहे.

  3. vivek

      7 वर्षांपूर्वी

    kalavantacha hath

  4. दीपाली दातार

      7 वर्षांपूर्वी

    असे नाते विरळाच. संपादक म्हणून अंतारकर किती मोठे होते. लेख पुनःश्च प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.

  5. natujaya

      8 वर्षांपूर्वी

    वाचून आनंद वाटला . धन्यवाद .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen