वर्षाचा पहिला महिना मार्च ?


अंक : 'वसंत' जानेवारी १९६४ पाश्चात्य संस्कृतीचा उगम रोमन संस्कृतीतून झाला आहे. अनेक पाश्चात्य परंपरांना रोमन लोकांनीच जन्म दिलेला आहे. इंग्रजी कॅलेंडरमधील महिन्यांचे नामकरणही रोमन लोकांनीच केले आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी ५० वर्षेपर्यंत रोमन वर्षाचा पहिला महिना मार्च होता. १८ व्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये मार्च ह्याच महिन्यापासून वर्षारंभ होत असे. फ्रान्समध्येही १५६४ पर्यंत मार्च हाच वर्षाचा पहिला महिना मानला जात असे. युद्धदेवता मार्सच्या स्मृतीकरता रोमन लोकांनी वर्षातील पहिल्या महिन्याचे नाव मार्च असे ठेवले होते. एप्रिलची व्युत्पत्ती एपेरायर या लॅटिन शब्दापासून झाली आहे. एपेरायरचा अर्थ खुले होणे, उमलणे असा आहे. या महिन्यात थंडीचा शेवट होऊन इतके दिवस सुप्तावस्थेत असलेली कळी उमलण्यास आरंभ होतो. माईवा ही वैभवाची देवता मानली जाते व मे हे नाव त्यावरून तयार झाले. या महिन्यात फुले व फळे यांनी झाडे डवरलेली असतात. ‘जुनो’ या रोमन देवीच्या नावावरून जून हे महिन्याचे नाव प्रचारात आले. जुनो ही महिलांची रक्षणकर्ती देवता आहे असे मानले जाते. यासाठी जून महिन्यात विवाहबद्ध होणाऱ्या स्त्रिया भाग्यशाली मानल्या जातात. ऑगस्टची कहाणीही काहीशी अशाच प्रकारची आहे. ज्युलियस सीझरनंतर त्याच्या जागी अधिकारावर आलेला आक्टोव्हियस हा अतिशय पराक्रमी राजा होता. रोमन साम्राज्याचा त्याने दूरवर विस्तार केला म्हणून रोमन पार्लमेंटने त्याला ‘ऑगस्टस’ अशी पदवी बहाल केली. त्यावरून ऑगस्ट हे नाव प्रचारात आले. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर यांचा अर्थ प्रत्यक्षात सातवा, आठवा, नववा व दहावा असा आहे. रोमन वर्षगणनेत येणाऱ्या या चार महिन्यांच क्रम-अनुक्रमे सातवा, आठवा, नववा व दहा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वसंत , ज्ञानरंजन , बालसाहित्य

प्रतिक्रिया

  1. Virginia Williams

      8 वर्षांपूर्वी

    I came to your वर्षाचा पहिला महिना मार्च ? – पुनश्च page and noticed you could have a lot more traffic. I have found that the key to running a website is making sure the visitors you are getting are interested in your subject matter. We can send you targeted traffic and we let you try it for free. Get over 1,000 targeted visitors per day to your website. Start your free trial: http://0nulu.com/opx Unsubscribe here: http://0nulu.com/nbz

  2. मुग्धा भिडे

      8 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर …….. समांतर भाषांतर कसं केलं असेल ?अजुनहि कल्पना करता येत नाहिये … स्वभाषेचे महत्त्व इतक्या मार्मिकपणे मांडणे हे हि कोतुकास्पदच

  3. Anuradha Deshpande

      8 वर्षांपूर्वी

    Very interesting info Sir



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen