अश्रू झाला आहे खोल…

अंक : सत्यकथा, ऑगस्ट, १९७६

लेखाबद्दल थोडेसे : काही माणसे अशी असतात, ज्यांच्याबद्दल चार शब्दही लिहिताना बोटे अडखळतात, त्यांच्या मोठेपणाला आपल्या एखाद्या अजागळ शब्दानं उणेपणा येऊ नये म्हणून! काही लेख असे असतात, ज्या लेखाबद्दल काहीही सांगितले तरी त्यात त्या लेखाच्या भावार्थाचा छोटासा अंशही येणं अवघड असतं. तो लेख स्वतः वाचणं, स्वतः अनुभवणं हाच सर्वोत्तम पर्याय असतो, तसा हा लेख आहे. आरती प्रभूंच्या मृत्यूनंतर संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकरांनी वाहिलेली ही शब्दांजली आहे.  आरती प्रभू उर्फ चिं त्र्यं. खानोलकर यांची ९० वी जयंती मार्चमध्ये झाली तर त्यांना जाऊन एप्रिलमध्ये  ४४ वर्ष झाली. हे निमित्त साधून खानोलकरांच्या कवितांचा, त्यांच्या साहित्यातील उतारे सादर करण्याचा एक कार्यक्रम ‘पुनश्च’ने सदस्यांसाठी योजला होता,परंतु ‘करोना’ने पुन्हा एकदा ‘गेले द्यायचे राहून,तुझे नक्षत्रांचे देणे’ असे म्हणायची वेळ आणली. दुर्दैव आरती प्रभूंचा पिछा सोडायला तयार नाही. या महान शापित कलावंताची कलंदर वृत्ती सांगणारा हा लेख तूर्तास वाचा, संधी मिळाली तर कार्यक्रम निश्चितच करु…

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 5 Comments

 1. bookworm

  अप्रतिम, आरती प्रभूंचे शब्द व ह्रुदयनाथांचा स्वरमेळ काळजाचा ठाव घेतो.

 2. mailimaye@gmail.com

  Surekh !👌👌👏

 3. ajitpatankar

  अतिशय आत्मीयतेने लिहिलेला लेख…इतके संवेदनशील लिखाण आजकाल वाचयला मिळत नाही.. आज सगळच बेगडी..
  फक्त कविता-कादंबरीवर साधी वाळवीही जगू शकत नाही. पण फक्त कलेवर जगण्याचं आव्हान तू स्वीकारलं होतंस.
  आरती! गडकरी किंवा तू जेव्हा लाचार होता, दीनवाणे होता तेव्हा मी खरा शरमतो. आम्हीच तुम्हांला लाचार, दीन करतो नाही?
  एखादं फिल्म मासिक लाखो रुपये मिळवत असताना, आरती किंवा गडकरी आपल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती केव्हा संपणार या विवंचनेत असतो.
  लेखातील ह्या वाक्यांनी मन सुन्न झाले…

  ‘येथे भोळ्या कळ्यांनाही, आसवांचा येतो वास’ ही ओळ दीदी (लता मंगेशकर) गात होती.
  भारावून किती किती आदरानं मी तुला विचारलं होतं, “आरती, ही ओळ कशी रे सुचली?”
  “मुलाचा मृत्यू बघून.” तुझं थंड आवाजातलं थंड उत्तर.

  Our sweetest songs are those that tell of saddest thought.
  :- Shelley

  दुर्दैवाने हे खरं आहे..

 4. atmaram-jagdale

  लेख खूपच आवडला . बरेच दिवस असं संवेदनशील लेखन वाचनात आलं नव्हतं . विशेषतः ऱ्हदयनाथ मंगेशकरांची गाणी ऐकलीय भरपूर पण त्यांनी गद्य काही लिहिलेल वाचलं नव्हतं . खूपच भावूक आणि ऱ्हदयस्पर्शी लिहिलयं त्यांनी .
  माझ्या कॉलेज जीवनात खानोलकरांचं बरचसं वाचलेलं . त्रिशंकू ‘गणूराया आणि चानी (चानी वाचून झाल्यावर रडूच आले होते . )अजगर , नक्षत्रांचे देणे ‘ ( काव्य ) कोंडूरा या कादंबऱ्या वाचनात आल्या . आवडल्या सुद्धा . पण त्यातील पात्रे खूप पराधीन वाटायची . अर्थात माझाच साहित्यिक दृष्टीकोन जास्त व्यापक नसल्यामूळे ( घडत असल्यामूळे ) आणि लेखका बदल चरित्रात्मक काही न वाचत्यामूळे प्रत्येक पुस्तक स्वतंत्र निर्मिती म्हणून वाचलं गेलं . पण वरील लेखाच्या वाचनाने आरती प्रभूच्या जीवनाची हेळसांड ( परिस्थिती ) वाचून वाईट वाटले .
  चांगले प्रतिभावंत सुदधा व्यवहारिक जगात पिडले जातात . गांजले जातात . याचेही वाईट वाटते . ( की त्यांच्याकडूनच चिरकाल टिकणारे साहित्य निर्माण होते ? )
  असो . पुन्हा एकदा थोडासा भूतकाळ उलगडला . ( माझा ) आजही त्यांची गाणी ऐकताना छान वाटते . त्यांनी दिलेले हे नक्षत्रांचे देणे हिच रसिकांची मिळकत !

 5. spruha

  किती आतून लिहिलेला लेख आहे! फार सुंदर!

Leave a Reply