भारतीय लोकशाहीची वाटचाल

पुनश्च    श्रीपाद जोशी    2020-06-06 06:00:35   

अंक : पुरुषार्थ – जानेवारी-फेब्रुवारी १९७५ लेखाबद्दल थोडेसे : २५ जून इ.स. १९७५ रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी  लागू केली होती, ती  २१ महिन्यांनी संपली. त्याआधीच विविध घटकांमधून आणिबाणीच्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या, कारण इंदिरा गांधी यांची पावले त्या दिशेने पडत असल्याचे स्पष्ट दिसत होते. प्रत्यक्ष आणिबाणी लागू होण्याच्या सहा महिने आधी प्रसिद्ध झालेल्या या लेखातही ते दिसून येते. लोकशाही मूल्यांचा सतत ध्यास घेतल्या गेलेल्या या देशाच्या लोकशाहीला बसलेला तो पहिला धक्का होता. आज ४५ वर्षांनी हा लेख वाचताना काय दिसते? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला गुणात्मक फरक संपुष्टात आला आहे. उलट कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी काही फरक पडणार नाही, अशी भावना तयार झाली आहे. ज्या व्यक्तिकेंद्रीत राजकारणासाठी इंदिरा गांधींवर टीका झाली, त्याच व्यक्तिकेंद्रीत राजकारणाचा आज खूप लोक गौरव करताना दिसतात.  'लोकशाही' नियंत्रित करण्याचे अधिक सुलभ, सुकर आणि अधिक 'लोकशाहीवादी' मार्ग आज उपलब्ध झालेले आहेत. परंतु काळाच्या संदर्भात असे लेख आपल्याला आपल्याच एकेकाळच्या मानसिकतेची आठवण मात्र करुन देतात. पुरुषार्थ या अंकात १९७५ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने स्वतःसाठी संसदीय लोकशाहीचा मार्ग स्वीकारला. आज जगातील सर्वात मोठी लोकशाही असा आपल्या लोकशाहीचा गौरवाने उल्लेख केला जातो. आपणही त्या गोष्टीचा उत्साहाने उदोउदो करीत असतो. परंतु जरा अंतर्मुख होऊन आपण विचार केला तर आपल्याला काय दिसून येते? आपल्या लोकशाहीने कोणत्या दिशेने वाटचाल चालविली अ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , राजकारण , पुरुषार्थ

प्रतिक्रिया

 1. Vilas Shamrao Wagholikar

    3 वर्षांपूर्वी

  योग्य विचार. त्यांनी प्रत्यक्ष हिंसक हुकूमशाही केली नाही. पण घराणेशाही केली

 2. aashishwat

    3 वर्षांपूर्वी

  लेखक ज्या व्यक्तिकेंद्रीत लोकशाही बद्दल खेद व्यक्त करत आहेत तेच जवाहरलाल नेहरूंच्या बद्दल आदर व्याकर करतात आणि त्यांच्या कृत्यांबद्दल खेद व्यक्त करतात. आजची परिस्थिती ही मोहनदास गांधीनी केलेल्या लोकशाहीच्या पहिल्या हत्येचा परिणाम आहे (काँग्रेस कार्यकारणीत ज्या नेत्याला निवडून दिले होते त्याच्या ऐवजी कोणत्याही हाल अपेष्टा न भोगलेल्या नेहरू यांच्या बद्दल अडून बसणे). तसेच आजचे व्यक्ती केंद्रित समाजभावना ही तो एक व्यक्तीच काहीतरी बदल घडवू शकतो या भावनेतून आलेली आहे, आणि ती लोकभवनाच आहे, त्यामुळे त्याचा आदर करायला हरकत नाहीये

 3. Sushama

    3 वर्षांपूर्वी

  मला हे लेख वाचायलाच येत नाहीत.. मी पुनश्च 'सर्व ' ची सभासद आहे.. तरी मला कोणताच लेख वाचायला मिळत नाही.

 4. सौ. गौरी दाते

    3 वर्षांपूर्वी

  ही लेखावरची प्रतिक्रिया नाही पण श्री. श्रीपाद जोशी यांचा पुरुषार्थ या अंकातीलच हा लेख आहे म्हणून ही विचारणा— खूप जुने, १९२० ते १९२५ च्या वेळचे पुरुषार्थचे अंक कुठे मिळतील का? पं. सातवळेकरांनी माझ्या आजीवर —सौ. उमाबाई चाफेकर — त्या वेळेस रहाणार तळेगाव दाभाडे, पैसा फंड काच कारखाना, हिच्यावर लिहिलेला लेख त्या अंकात आहे. त्या काळात घरी कोणालाही समजू न देता पतीने श्री. गो.गो. चाफेकर यांनी पत्नीला पोहायला शिकवले...हे वर्षभराने सर्वांना समजल्यानंतर लिहिलेला लेख आहे तो..वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen