अंक – चित्रमय जगत, जुलै १९३२ लेखाबद्दल थोडेसे: 'जुने ते सोने' ही म्हण कागदपत्रे, इतिहासाची साधने, बखरी, युद्धांचे वृत्तांत, दफ्तरे, राजघराण्याचे इतिहास अशा अनेक बाबतीत गफलत करू शकते. कोणत्याही प्रकारे नोंदी करुन ठेवणाऱ्याचा हेतू पाचशे-हजार वर्षांनी आपल्याला कळणे शक्य नसते, त्यामुळे जुनी कागदपत्रे वाचताना, त्यांचे अर्थ लावताना खूपच खबरदारी घ्यावी लागते. सोने जसे कसाला लावले जाते तसा इतिहासही विविध प्रकारे पारखून घ्यावा लागतो. शिवाय सत्य गवसले तरी त्या सत्याचे अर्थ काढणारा कोणत्या बाजूचा आहे यावरही इतिहासाचा अर्थ लावला जातो. गेल्या हजार वर्षात 'हिंदुस्थान'च्या इतिहास झालेली मोठी युद्धे, आल्या-गेलेल्या राजवटी याबाबत जे काही लिखित साहित्य आहे, त्याचा आणि इतिहासाच परामर्ष घेणारी ही लेखमाला आहे. यातील पहिला लेखांक आपल्या हाती लागला आहे. १९३२ मध्ये चित्रमय जगत या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... [लेखांक १ ला] राज्यक्रांती होते त्यावेळी एक राजकीय सत्ता उलथून पडून तिच्या जागी दुसरी अस्तित्वांत येते. यामुळे देशांत अगर समाजांत फार मोठे स्थित्यंतर अशा प्रसंगाने घडून येत असते. आणि याच कारणास्तव या जातीच्या क्रांतिकारक पराभवाची मीमांसा इतिहास लेखकास अतिशय विचारपूर्वक करणे आवश्यक वाटते. गेल्या हजार वर्षांचा हिंदुस्थानचा इतिहास पाहूं गेल्यास त्यांत तीन क्रांतिकारक प्रसंग प्रमुखपणे आपल्या दृष्टीस पडतात. पहिला रजपूतांची राजवटी संपून मुसलमानी राज्यास सुरुवात झाली तो; दुसरा, मुसलमानी राज्यांतून मराठी राज्याचा उदय झाला तो आणि तिसरा, मराठी साम्राज्याच्या जागी इंग्रजांचे साम्राज ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
[email protected]
5 वर्षांपूर्वीवेगळ्या धाटणीचा आणि विचारांचा.
smileasalways
5 वर्षांपूर्वीअसे काही भारतीय इतिहासकार आहेत की जे या मताशी सहमत नाहीत त्यांचे मत कळले तर बरे होईल
[email protected]
5 वर्षांपूर्वीखुप माहीतीदायक
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीमाहिती पुर्ण लेखन .