आदिवराह


डुक्कर म्हटले की कसेसेच होते परंतु वराह म्हटले की थोडा भक्तीभाव जागा होतो. आपली पुराणे आणि पौराणिक दंतकथांमध्ये ज्या अनेक विलक्षण कथा आढळतात त्यात डुकराची अर्थात वराह अवताराची कथा फारच रंजक आहे. पंडित महादेवशास्त्री जोशींनी या लेखात डुक्कर अर्थात वराहाशी निगडीत इतरही अनेक कथा, समजूती, किस्से सांगितले आहेत. १९५८ साली 'श्रीसरस्वती' च्या दीपावली  अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख जराही कालबाह्य झाला नाही, याचे कारण त्याचा विषय. हाच लेख आपण आणखी शंभर वर्षांनी वाचू तेंव्हाही तेवढाच ताजा, तेवढाच रंजक असेल. पं. महादेवशास्त्री सीताराम जोशी ( १२ जानेवारी १९०६-  १२ डिसेंबर १९९२) हे  लेखक व कोशकार होते. वेदान्त, व्याकरण, ज्योतिष, काव्यशास्त्र यांचे  अध्ययन करून त्यांनी शास्त्री ही पदवी संपादन केली होती. रसरशीत वर्णने, रसाळ भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य.  त्यांच्या कथांवर 'कन्यादान', 'धर्मकन्या', वैशाख वणवा', 'मानिनी', 'जिव्हाळा', 'थांब लक्ष्मी कुंकू लावते' हे चित्रपटही झाले. भारतीय संस्कृती कोश मंडळाचे ते संपादक होते.  प्रथम प्रसिद्धी- श्रीसरस्वती, दीपावली १९५८ एक दिवस एका अरण्यांत डुक्कर आणि सिंह यांची सहजगत्या गांठ पडली. डुकराने जमिनीत मुसंडी खुपसून थोडीशी माती वर उधळली आणि ‘सुंक् सुंक्’ करीत तो सिंहाला म्हणाला, “सिंह महाराज! बरे भेटलांत. मी तुम्हालाच शोधीत होतो. यापूर्वी मी दहा वाघ जिंकले आहेत आणि सात सिंहांना पाणी पाजले आहे. एकटा तू राहिला होतास तो आज भेटलास. चल, आता तुझी माझी लढाई होऊन जाऊ दे. तुझ्यावर झडप घालून तुला आडवा उभा लोळवतांना स्वर्गातले देव माझा पराक्रम पाहून थक्क होतील.” त्यावर सिंहाने सहजगत्या एकदां मान हलवली. आपला जबडा उघ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


माहिती , ललित

प्रतिक्रिया

 1. Shrinivas.watve

    10 महिन्यांपूर्वी

  छान अनोखी माहिती

 2. [email protected]

    12 महिन्यांपूर्वी

  कितीतरी नवीन गोष्टी कळल्या ! पुराण मजा म्हणून वाचायला छान वाटते

 3. dsjoshi41

    12 महिन्यांपूर्वी

  नवीन माहिती.

 4. atmaram-jagdale

    12 महिन्यांपूर्वी

  अनोखी माहिती . माहिती विस्मय जनक असली तरी आता बुद्धीला काही पटत नाही पुराणातली वांगी (वाणगी ) पुराणातच ठीक .

 5. [email protected]

    12 महिन्यांपूर्वी

  Chan !

 6. vrushali

    12 महिन्यांपूर्वी

  खूप छान लेख आहे

 7. [email protected]

    12 महिन्यांपूर्वी

  खूपच वेगळी माहिती मिळाली, धन्यवाद

 8. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  सुंदर आहे धन्यवाद😘💕

 9. shripad

    2 वर्षांपूर्वी

  छान लेख आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen