अंक : वसंत, जानेवारी १९६६ लेखाबद्दल थोडेसे : उंची कोणाला नको असते? यश, कीर्ती, श्रीमंती, सधनता अशा अनेक बाबींचे वर्णन करताना 'उंची' हा शब्द सकारात्मक म्हणून वापरला जातो. मग शारीरिक उंचीची तर बातच वेगळी. विशेषतः पुरुषाच्या बाबतीत उंची हा सौंदर्याचा एक मापदंड मानला जातो. तर अशा उंचीची आरोग्याच्या अंगाने चिकित्सा करणारा हा लेख. लेख १९६६ साली प्रसिद्ध झालेला आहे. पण त्याने काय फरक पडतो? उंची तीच आहे आणि तिचे महत्वही तेच आहे. ******** उंचींतील विकृति : कारणापरत्वे ठेंगू मुलांचे दोन प्रकार आढळतात.कित्येकदा बालपणी झालेल्या मुडदूस, अस्थिक्षय, पोलिओसारख्या रोगांनी पाठीचा कणा व पाय वेडेवाकडे व विकृत होतात. असे मूल सरळ उभे राहू न शकल्यामुळे त्यांची उंची कमी भासते. परंतू हे विकृत उंचीचे नमुने नव्हेत व उंचीचे शास्त्रही त्यांच्या उपयोगाचे नाही. हाडांच्या सर्जनकडून ऑपरेशनसारख्या उपायांनी त्यांचे विकृत भाग सरळ करणे शक्य असते. ‘उंची’ उंचीप्राप्तीचे उपाय – वाढत्या मुलांना आरोग् ...
- ज्यांच्या ठेंगूपणाबरोबर इतर आरोग्यातही बिघाड असतो अशी मुले. यांत हृदयविकार, फुफ्फुसविकार, पचनक्रियाविकार, दीर्घ मुदतीचे विकार इत्यादी कारणांचा समावेश होतो. आरोग्यांतील बिघाडामुळे अशी मुले सहसा फॅमिली डॉक्टरांकडे उपचारासाठी नेली जातात.
- जी केवळ ठेंगू असून इतर बाबतींत आरोग्यसंपन्न असतात अशी मुले. यांत आनुवंशिक ठेंगूपणा व हॉर्मोन्सच्या स्रावांतील दोष या कारणांचा समावेश होतो. अशा मुलांचे पालक उंचीचे शास्त्र व तज्ज्ञ शास्त्रज्ञ यांच्या शोधांत असतात.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
shripad
5 वर्षांपूर्वीया लेखात एका तक्त्याचा उल्लेख आहे. तो तक्ता पण देता येईल का? धन्यवाद!
[email protected]
5 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण व ताजातवाना लेख