असे साहित्यिक आणि अशी आणीबाणी

अंक : रुची,  ऑक्टोबर-नोव्हेंबर – दिवाळी १९७८

लेखाबद्दल थोडेसे : आणीबाणीच्या काळात अनेक साहित्यिक मूग गिळून गप्प होते, ती संपल्यावर आणि इंदिरा गांधींचा पराभव झाल्यावर मात्र, आपण आणीबाणीला कसा  विरोध केला याचे किस्से अनेकजण रंगवून सांगू लागले. त्यातील खरे- खोटे तपासण्याची  कोणतीही सोय नव्हती. त्या स्थितीत साहित्यिकांचे स्वभाव आणि मराठीतील एकेका नियतकालिकांची प्रकृती लक्षात घेऊन करण्यात आलेला हा अतिशय संपन्न, प्रगल्भ  आणि मिश्कील असा  विनोद आहे. जाणत्या वाचकांना त्यातील नेमकी गंमत कळेल. कलंदराच्या तीक्ष्ण विनोदबुद्धीचा हा फर्मास नमुना आहे.

कलंदर म्हणजे अशोक जैन हे आता फार जुनं रहस्य झालेलं आहे. हा लेख प्रसिद्ध झाला तेंव्हा मात्र कलंदराचं खरं नाव फार कमी लोकांना माहिती होतं. अशोक जैनांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये कानोकानी हे सदर लिहिण्यासाठी घेतलेल्या या टोपणनावाप्रमाणेच त्यांचा स्वभावही कलंदराचाच होता. बरीच वर्षे दिल्लीत राजकीय पत्रकार म्हणून वावरताना त्यांनी दिल्लीतील मराठी संस्कृतीही महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहोचवली. कलदरांच्या पोतडीत त्यामुळेच राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक असे धमाल किस्से भरलेले असत. ‘मटा’मधलं त्याचं  सदर अमाप लोकप्रिय झालं होतं. या गोष्टीवेल्हाळ माणसाचं २०१४ साली निधन झालं.

रुची मासिकाच्या १९७८ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च…

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 5 Comments

 1. sumamata@gmail.com

  माझे जवळचे स्नेही अशोक जैन यांचा हा लेख पुन्हा वाचताना ओठांत हसू आणि डोळ्यांत आसू होते.ते इतक्यात जायला नको होते .

 2. ppkchemicals@gmail.com

  छान कलंदर

 3. vskadam

  हा लेख अशोक जैन यांच्या अशोकवन या पुस्तकात आहे.आणीबाणीची खिल्ली उडवीणारे बरेचसे लिखाण हे आणीबाणी उठल्यानंतरच झाले.

 4. advshrikalantri@gmail.com

  आणीबाणीत काही पत्रिका नी विरोधी आणि स्वतंत्र भूमिका घेतली होती. त्या लेखकान्चा उल्लेख या लेखात नाही. इन्डियन एक्स्प्रेस समुह आघाडी वर होते. म्हणजे लोकसत्ता ने ही लढाउ भूमिका घेतली असावी.आणीबाणी ला पाठिंबा देणारे ही खूप होते. नारायण आठवले यान्त आघाडी वर होते

 5. sidhayevarsha277@gmail.com

  अशोक जैन यांच्या इतर लेखांसारखाच हाही खूप मस्त …टोप्या उडवणारा!👌👌

Leave a Reply