आमचे शत्रू आम्हीच


अंक : किर्लोस्कर मासिक , ऑगस्ट १९३१

लेखाबद्दल थोडेसे :  भारताच्या इतिहासात १९३१ चा काळ हा दूरवर स्वातंत्र्याची पहाट दिसू लागल्याचा काळ होता. हळूहळू आपण त्या दिशेने जात आहोत ही जाणीव जनमनात रूजू लागली होती. अशा वेळी समाज चिंतकांच्या मनात पहिला विचार हा येत होता, की उद्या स्वातंत्र्य मिळाले तर  देश चालविण्यासाठी विविध प्रकारची योग्यता असलेल्यांची उणीव भासायला नको. तेव्हा तरुणांच्या मनातील आकाक्षांचा अग्नी चेतवणे गरजेचे होते. कधी उपदेश, कधी विनोद, कधी आवाहन तर कधी आग्रह अशा विविध प्रकारांचे लेख प्रसिद्ध करुन  नियतकालिके देश उभारणीसाठीचे प्रयत्न करत होते. प्रस्तुत लेखात विनायक वैद्य यांनी विनोदाचे, थोडे मिश्कीलपणाचे पांघरुण घेत हेच काम केलेले आहे. नोकरीच्या मागे लागणाऱ्या मराठी तरूणांनी उद्योग,व्यवसायाकडे वळावे यासाठीचा एक प्रयत्न म्हणजेच हा लेख.  या लेखात ओघाओघात 'भय्या' असा जो उल्लेख आलेला आहे, तो आपण आज ज्या बिहारी, युपीतील श्रमीकांचा भैय्या असा उल्लेख करतो, त्यांचाच असेल तर 'भैय्या' महाराष्ट्रात आलेल्यालाही आता शंभर वर्षे होत आली असा त्याचा अर्थ होतो. अर्थात लेखातला हा केवळ एक छोटा उल्लेख, बाकी लेख आधी म्हटल्यानुसार पायाभरणीच्या हेतूने लिहिलेला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ही  केलेली ही उजळणी आपल्याला 'जबाबदारीचा' संदेश सहजच देऊन जाते. ९० वर्षांपूर्वी किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च...********

आमचे स्वतःवर इतके आंधळे प्रेम असते की त्यामुळे आपला आत्मघातकीपणा आम्हाला दिसत नाही. बारकाईने आत्मपरीक्षा करून दोष घालविले तर मात्र आपण आपले खरे मित्र होऊं.

इंग्रजांनी  ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चिंतन , किर्लोस्कर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.