अ.भि.शहाः माणसं स्थापन करणारी संस्था


अंक – अभिरुचि – दिवाळी, १९८१ लेखाबद्दल थोडेसे : एका मोठ्या माणसानं दुसऱ्या मोठ्या माणसाविषयी मनापासून लिहावं असा फार दुर्मीळ योग आजच्या या लेखासंबंधी घडून आलेला आहे. इंडियन सेक्युलर सोसायटीचे संस्थापक ए. बी शहा हे साठ आणि सत्तरच्या दशकातील मराठी-इंग्रजीतील सुधारणावादी वैचारिक, साहित्यिक चळवळीतील आघाडीचे विचारवंत.  तर दिलिप चित्रे हे कवी, समीक्षक, चित्रकार, इंग्रजी भाषेचे जाणकार आणि सेक्युलर विचारांचे कट्टर पाठीराखे. शहा यांच्या वैचारिक प्रभावाखाली आणि नेतृत्वाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.  १९८१ साली शहा यांच्या निधनानंतर चित्रे यांनी अभिरुचीच्या दिवाळी अंकात लिहिलेला हा लेख आहे. यातून केवळ शहा यांचे व्यक्तिचित्र उभे राहात नाही, तर तेंव्हाचे सामाजिक, राजकीय वातावरण, वैचारिक प्रवाह आणि मानवी स्वभावाचे हळवे पैलूही दिसून येतात. आपल्या वाचन श्रीमंतीमध्ये मोलाची भर घालणारा हा लेख आहे. १९८१ च्या अभिरुची दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** मी त्यांना भाईजी म्हणत असे. गेली सोळा वर्षे माझा आणि त्यांचा अतिशय निकटचा संबंध होता. १९६५ ते १९६९ ही चार वर्ष मी त्यांच्याबरोबरच काम करत होतो. पुढे इंटरनॅशनल असोसिएशन फॉर कल्चरल फ्रीडमची नोकरी मी सोडली तरी आमचं काम चालू राहिलंच. १९७८ साली मी अमेरिकेतून परतलो तेव्हा ते निवृत्त व्हायच्या गोष्टी बोलू लागले होते. ‘न्यू क्वेस्ट’चं संपादन मी हाती घ्यावं आणि मुंबई सोडून पुण्यात स्थायिक व्हावं असा त्यांचा आग्रह होता. मी संपादकत्व पत्करलं पण पुण्याला स्थायिक होणं मला शक्य नव्हतं. दोन वर्षांनी मी संपादकत्वाचा राजिनामा दिला. गेल्या दीड वर्षात आमच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अभिरुची , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

 1. Diwakar

    8 महिन्यांपूर्वी

  खूप सुंदर. . .

 2. Sunanda

    8 महिन्यांपूर्वी

  हा लेख दिल्याबद्दल धन्यवाद. शहांची स्मृती चिरंतन होणे आवश्यक आहे. वर्षाकाठी त्यांच्या नावे व्याख्यानमाला वगैरे व्हायला हवी.

 3. [email protected]

    9 महिन्यांपूर्वी

  अप्रतिम व्यक्तिचित्रण

 4. asmitaphadke

    10 महिन्यांपूर्वी

  नेमके व्यक्तीचित्र !!

 5. [email protected]

    10 महिन्यांपूर्वी

  उत्तम लेख !

 6. [email protected]

    10 महिन्यांपूर्वी

  चांगला आहें

 7. rajandaga

    11 महिन्यांपूर्वी

  Very good

 8. Anil Chavan

    11 महिन्यांपूर्वी

  खुप सुंदर लेख . फार सुंदर माहीती मिळाली पुढे श्री अ भि शहा व चित्रे ह्यांनी त्यावेळी केलेल्या कामाची माहिती घ्याविशी वाटत आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या संपन्नते मध्ये भर टाकणारी ही थोर व्यक्तिमत्वे व त्यांच काम स्फुर्तिदायक आहे . आनंद वाटला.

 9. [email protected]

    11 महिन्यांपूर्वी

  पहिल्यांदाच वाचलं, शहांबद्दल, धन्यवाद, माहीती मिळाल्याबद्दल

 10. [email protected]

    11 महिन्यांपूर्वी

  अप्रतिम आहेवाचण्यासारखे अजून काही ...