असा आहे आमचा मराठवाडा

अंक : चित्रमयजगत , जानेवारी १९५७

लेखाबद्दल थोडेसे : आज मराठवाड्याची प्रसारमाध्यमांत चर्चा होते ती दुष्काळी प्रदेश किंवा पाण्याची टंचाई असलेला भाग म्हणून. या चर्चेत तथ्य आहे यात वादच नाही, परंतु मराठवाडा म्हणजे काही एवढेच नव्हे. साहित्य,संस्कृती, स्वातंत्र्यलढे, उद्योग अशा सर्वच अंगांनी हा प्रदेश समृद्ध आहे. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला तेंव्हा हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. मराठवाड्याचा बराचसा भाग निजामाच्या ताब्यात होता. तेंव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली नवा स्वातंत्र्यलढा सुरु झाला त्याला मराठवाडा मुक्ती संग्राम असे नाव दिले गेले. रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी हा संग्राम तीव्र केला त्यातून अखेर  १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी मराठवाडा स्वतंत्र होऊन तो स्वतंत्र भारताचा भाग झाला. त्यामुळेच या परिसरावर अजूनही उर्दू संस्कृती-भाषा यांची छाप आहे, मात्र ती मराठीशी आता एकरुप झाली आहे. संत एकनाथांची भूमी असलेल्या या भागाचा विकास व्हावा यासाठी १९९४ रोजी विकास मंडळांची स्थापना झाली. पुढे औरंगाबाद ही उद्योगनगरी झाली. अनंत भालेराव, शंकरराव चव्हाण, न्या नरेंद्र चपळगावकर, डॉ. सुधीर रसाळ, प्रभाकर बागले, श्रीकांत उम्रीकर, सुहास जेवळीकर, चंद्रकांत कुळकर्णी, प्रशांत दळवी अशा अनेकांनी  मराठवाड्याला विविध क्षेत्रात वैभव प्राप्त करुन दिले आहे. त्या परिसराचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहास सांगणारा हा लेख.  चित्रमयजगत च्या जानेवारी १९५७ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च…

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 3 Comments

 1. daherenkoji@gmail.com

  माझ्या जन्मा अगोदरचा हा लेख..आज उणीपुरी ६२-६३ वर्षे झाली, माझ्या मराठवाड्याचा दैदिप्यमान इतिहास आपल्यामुळे समजला. जुजबी माहिती होती..पण या लेखाने, मंदिरापुढची दीपमाळ लख्ख उजळावी, तसा मराठवाड्याविषयी ज्ञानाचा प्रकाश उजळला. खूप खूप आभार..आपण हे निश्चित महान कार्य आरंभले आहे..यात उदंड यश लाभो, ही सदिच्छा.!

 2. kuldeepghorpade116@gmail.com

  खूप छान माहिती मिळाली.

 3. prasadj21@gmail.com

  मराठवाड्याचा न्यूनगंड दुर करणारा लेख. शेवटचा पॅऱाग्राफ वाचताना जाणवले की 1957 ला जशी परिस्थिती होती त्यात संख्यात्मक फरक असला तरी गुणात्मक फार काही फरक पडलेला नाही.
  विशेषतः राज्यकर्त्यांचा मराठवाड्याकडे बघण्याचा दृष्टीकोण हा १९५७ सारखाच आहे.
  हा महत्वपूर्ण लेख वाचकांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल पुनश्च चे आभार.

Leave a Reply