ह्या गंगेमधिं गगन वितळले…

अंक – सत्यकथा, जून १९५१

लेखाबद्दल थोडेसे :  बाळ सीताराम मर्ढेकर ( १ डिसेंबर १९०९-२० मार्च १९५६) हे मराठीतील आजवरचे सर्वाधिक ‘लिहिले गेलेले’, ‘चिकित्सा केले गेलेले’ कवी आहेत. त्यांच्या कवितांची संख्या फार नाही, परंतु एकेका कवितेवर लिहिलेल्या समीक्षात्मक लेखांची संख्या मोठी असेल. त्यांच्या मृत्यूला साठहून अधिक वर्षे झाली आहेत तरीही त्यांच्या कवितांच्या नवनव्या अर्थाचे विविध पदर उलगडवून दाखविण्यास समीक्षक उत्सुक असतात. मर्ढेकरांच्या ज्या कवितांचे गुढ सौंदर्य वारंवार साद घालते त्यात ‘पिपांत ओल्या मेले’, ‘बढवित टिर्र्या अर्धपोटी’ या कवितांएवढीच ‘ह्या गंगेमधिं गगन वितळले’ ही कविताही महत्वाची आहे. मर्ढेकर हयात असतानाच १९५१ साली सत्यकथेत प्रस्तुत लेख प्रसिद्ध झाला होता. कवीच्या हयातीतच त्याच्या काव्याची अशी चर्चा होण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. हा लेख वाचताना कविता तर कळतेच, मर्ढेकरही नव्याने कळतात, आवडू लागतात. सत्यकथा मासिकात जून १९५१ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च…

********

मराठी कवितेच्या इतिहासांत मर्ढेकरांचे स्थान स्वतंत्र आहे. मर्ढेकर आजच्या नवकाव्याचे युगप्रवर्तक असले तरी मर्ढेकरांची कविता आणि इतर नवकाव्य यांत मोठाच फरक दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे मर्ढेकर हे अतिशय आत्मनिष्ठ कवि आहेत. त्यांच्या गाण्यांतील भावभावना, कल्पना, प्रतिमा वगैरे सारेच विश्व खास मर्ढेकरांचे आहे. त्याचे अनुकरण करतां येणार नाही. म्हणनच मर्ढेकर संप्रदाय हा शब्दप्रयोग अर्थहीन ठरतो. मर्ढेकरांच्या काव्यांत आशय आणि अभिव्यक्ती यांत एकजीवपणा आहे. उपमा अगर प्रतिमा यांना स्वतंत्र स्थान नाही. त्यामुळे काही ठिकाणी निष्फळ प्रतिमांतूनच आशय शोधावा लागतो.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has One Comment

  1. rajandaga

    Uttam

Leave a Reply