जून येतोयः सावध!

पुनश्च    लैला महाजन    2020-07-15 06:00:37   

अंक: माहेर, जून १९७० लेखाबद्दल थोडेसे : लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल, हा लेख तर मे महिन्यात द्यायला हवा होता. खरं तर ते खरंच आहे, हा लेख मे मध्येच वाचायला हवा होता. पण मे मध्ये नेहमी जे होत असतं ते यावर्षी 'मे'मध्ये झालंच नाही. ना परीक्षा झाल्या, ना निकाल लागले, ना नव्या वर्षाची तयारी सुरु झाली. तर हा लेख आहे मुलांच्या शाळा, आपली मुले स्मार्ट व्हावीत, स्पर्धेत टिकावीत म्हणून आई- वडीलांच्या होणाऱ्या घालमेलीवर, हतबलतेवर. लेख आहे पन्नास वर्षांपूर्वीचा म्हणजे १९७०च्या 'माहेर'च्या अंकात आलेला, परंतु जशा अनेक गोष्टी गेली पन्नास वर्षे टिकून आहे, त्यातलीच हीसु्द्धा एक. वाचा म्हणजे आपण होतो तिथेच आहोत, हे लक्षात येईल. लैला महाजन या ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारकही. मुलांच्या,युवकांच्यासाठी त्यांनी बरेच लेखन केले, भटकंती केली. ********** पोटाच्या भुकेमुळं? नोकरीच्या ओढीमुळं? की परिस्थितीच्या दडपणामुळं? की लोकलनं! अन लहान म्हणजे बारा पूर्ण झालीयत तिला. आतापासून सगळं अंगवळणी पडायला हवं. कारण तिला पुढचं आयुष्य मुंबईतच काढायचंय. गाड्या पकडायच्या कशा, गाडीत घुसायचं कसं, ...आतापासूनच शिकलं म्हणजे पुढं जड जाणार नाही. कांगारूच्या पिलांगत पोरांना पोटाशी धरायचं... सदोदित... जरा त्यांच्यावर जबाबदारी टाकायची नाही. एकटं सोडायचं नाही. गुळुमुळू वागायचं. बबड्या छबड्या करून लाड करायचे. मला नाही पसंत... माझी पोरगी मला स्मार्ट व्हायला हवीय. ख्रिश्चन, पारशी,सिंध्यांच्या पोरीसारखी, धडाडीची, फटकाडी व्हायला हवी. बाकीच्या पोरीसारखं तिनं बुळं व्हायला नको. ” दीनवाण्या चेहऱ्यानं निमा ऐकतच होती. अन मीही तोंडात मारल्यासारखी ओशाळवाणी... निमा मुकाट निघू ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


समाजकारण , माहेर

प्रतिक्रिया

 1. ashish.munishwar29@gmail.com

    7 महिन्यांपूर्वी

  Vastvdarshi lakh chan ahe

 2. atmaram-jagdale

    7 महिन्यांपूर्वी

  लेखिकेने खूपच वास्तवदर्शी असा लेख लिहिलेला आहे . मी स्वतः एका खेडेगावात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो .मराठी माध्यमात काम करतो . नव्या पिढीची मानसिकता ' खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आलेली आर्थिक समृद्धी यामुळे बऱ्याच आई-वडिलांना आपली मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालावीत असं आजकाल खेडेगावात 'छोट्या शहरांमधून वाटू लागल आहे . यावर्षी करोना प्रादुर्भाव असल्यामुळे बरीचशी इंग्रजी माध्यमातील मुलांची ऍडमिशन आमच्या मराठी शाळेमध्ये झालीत . खरंतर मराठी माध्यमातून आणि मराठी शाळांमधून दिले जाणारे शिक्षण मुलांच्या भावविश्वाचाची ' कुटुंबाच्या पर्यावरणाशी जुळणारं असंच शिक्षण असतं . ज्यातून मुलांचा आत्मविश्वास वाढतो परंतु कालाय तस्मै नमः म्हणतात ते काही खोटं नाही .दप्तराच्या ओझ्याचा लेखिकेने मांडलेल्या प्रश्न अजूनही सुटलेला नाही .अजूनही मुलांच्या पाठीवर अवास्तव दप्तरांचे ओझे आहेच . त्यामुळे लेख वाचताना हा 1970 सालचा लेख आहे असं मला वाटलंच नाही माझा जन्मच 1969 चा लेख 2020 साठी सुद्धा इतकाच प्रत्ययकारी आहे असं म्हणायला हरकत नाही . शिक्षण क्षेत्रात वरवरचे बदल सोडले तर मुळातल्या समस्या आहे तिथेच आहेत असं समजायला हरकत नाही हा लेख वाचून त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला

 3. ajitpatankar

    7 महिन्यांपूर्वी

  हा लेख १९७० सालचा आहे?वाचन संस्कृती असो वा मराठी पुस्तकांचा खप असो वा शिक्षण असो.... काळ बदललेला नाही.....तीच चिंता, त्याच तक्रारी, तेच उपाय..वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.