इदंमम शरीरं

पुनश्च    माधव आचवल    2020-07-04 06:00:22   

पूर्वप्रसिद्धी- मौज दिवाळी अंक १९७० लेखाबद्दल थोडेसे : माणूस आपलं शरीर 'टेकन फॉर ग्रँटेड' म्हणजे गृहित धरत असतो. तो तो अवयव नीट काम करत असतो तेंव्हा त्याची जाणीव होत नाही, मात्र दुखलं, खुपलं की मग  त्याचं महत्व कळतं.  परंतु 'तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी' अशा पद्धतीनं आपण आपल्याच शरीराशी संवाद साधला तर तो संवाद कसा असेल? माधव आचवलांचा प्रस्तुत लेख म्हणजे असाच संवाद आहे. प्रातिनिधिक असल्याने तो केवळ त्यांचा राहात नाही. शब्द त्यांचे आणि भावना सगळ्यांच्या, असे हा लेख वाचताना जाणवते. आचवल हे मुळातले वास्तूशास्त्रतज्ज्ञ परंतु ते उत्तम ललित लेखक, समीक्षक होते. 'सत्यकथेचे लेखक' अशी त्यांची ओळख होती. हा संपूर्ण लेख अत्यंत प्रवाही तर आहेच परंतु त्यातील काही उल्लेख आपल्याला स्तिमितही करतात. मेंदू आणि शरीर यांच्यात कशाप्रकारे सहकार्य, देवघेव होत असते हे सांगताना ते मेंदूचं वर्णन 'या शरीराचं काँप्यूटर सेंटर' असा करतात. ते वाचताना हा लेख पन्नास वर्षांपूर्वीचा आहे हे लक्षात आलं की आपण अचंबित होतो. काळाच्या पुढे असणारं आणि म्हणूनच आजही कालसुसंगत ठरेल असं लेखन हाच तर पुनश्चचाही विशेष आहे. लेख वाचा आणि मराठीतील लेखनाची ही श्रीमंती अनुभवा. १९७० मध्ये मौज दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** नेहमीप्रमाणे अगदी भल्या पहाटे जाग येते. जागृतीच्या पहिल्या क्षणीच, मनात जे शिवण-कामाचं यंत्र सतत चाललेलं असतं, त्याचा धागा तुटतो, आणि स्वप्नाची अर्धी शिवलेली बाही लोंबू लागते. तो तुकडाही धरायला जावं तर मलमलीसारखा होतो, आणि मग नाहीसाच होतो. काय होतं ते स्वप्न? स्वप्न म्हणे आठवून लिहून ठेवावी. ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , मौज , ललित

प्रतिक्रिया

  1. vilasrose

      4 वर्षांपूर्वी

    लेख अप्रतिम आहे.लेखकाने आपण आपल्या शरीराशी संवाद साधला पाहीजे, हे खूप वेगळ्या रीतीने पटवून दिले आहे.लेखकाने स्वप्नात पाहीलेल्या गोष्टी वाचल्यावर खूपच गंमत वाटली.आपल्याला पडलेल्या स्वप्नाची नोंद आपण ठेवली तर!असा विचार मनात आला.

  2. 9423584026

      4 वर्षांपूर्वी

    अद्भुत लेख आहे...स्वप्न आणि जागृतीच्या सीमेवर आणि समेवर लिहिलेला..एखादं abstract शिल्प किंवा painting असावं तसा.. सगळंच कळत नाही पण अनिर्वचनीय अनुभूती मात्र येते...

  3. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    Sundar

  4. atmaram-jagdale

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर असा लेख ! बऱ्याच दिवसानंतर वाचनामध्ये आला . खरं आहे आपलं शरीर आपल्या सोबत असत . आणि जाणीवपूर्वक आपण त्याची दखल घेत नाही . काही दुखलं-खुपलं आजारपण आलं , की आपल्याला आपल्या शरीराची जाणीव होते . खरंतर आपल्या शरीराशी आपण वेळोवेळी संवाद साधला पाहिजे . लेखकाने अतिशय तरलपणे आणि नाविन्यपूर्ण मांडणी करून या गोष्टी सांगितल्या आहेत .आवडल्या . जुन्या मधील असेच चांगले लेख वेळोवेळी वाचण्यासाठी पुरवावेत अशी आपल्याला विनंती आहे .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen