गणितांतील अजब प्राणी

अंक : हंस, जानेवारी १९५८

हल्ली आपण शून्यांधळे झालो आहोत. म्हणजे काय तर आपण जे आकडे ऐकतो त्यांत किती शून्य असतील याचा विचार करणे आपण सोडून दिले आहे. किती तरी हजार कोटी रूपयांचे घोटाळे, बँकांच्या बुडीत कर्जाचे महाकाय आकडे आणि एखाद्या प्रकल्पासाठी मंजूर होणाऱ्या अजस्त्र रकमा ऐकून आणि वाचून आपल्याला शून्यांची आता नवलाई वाटत नाही. शिवाय प्रत्येकाच्या हाती असलेल्या स्मार्टफोनवर कॅल्क्युलेटर नामक गणिती विराजमान असल्याने हिशेबात तीन पेक्षा जास्त शून्यांचा विचार करायचा झाला तर  तोच करतो. परंतु ज्यांना गणित हा विषय वाटत नाही तर छंद वाटतो, अडथळा वाटत नाही तर कलानंदाचे साधन वाटते त्यांच्यासाठी ‘आकडेमोड’ हा ललीत विषय असतो. तब्बल बासष्ट वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला हा लेख गणिताकडे पाहण्याचा असाच एक दृष्टिकोन देतो. हंस या अंकात जानेवारी १९५८ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च…

********

रविवारचा दिवस होता. जेवणानंतरचा वामकुक्षीचा कार्यक्रम मी ताबडतोब सुरू केला होता. बाहेर सतीश आणि श्रद्धा यांचा संवाद चाललेला होता, तो मी पडल्यापडल्याच ऐकत होतोः

“मामा मला दहा गोळ्या देणार आहे.” श्रद्धा म्हणाली.

“मला तर शंभर देणार आहे!” सतीशने नुकत्याच कुठेतरी ऐकलेल्या ‘शंभर’ ह्या शब्दाचा उपयोग करून म्हटले.

“पण मामा मला हज्जार गोळ्या देणार आहे!” श्रद्धेला हजाराची कल्पना असल्याने तिने त्याचा उपयोग केला.

पण सतीश कांही कमी नव्हता. त्यानें शंभर आणि हजार या दोन्ही शब्दांचा उपयोग करून म्हटले, “मला शंभर हजार गोळ्या देणार आहे!”

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 2 Comments

  1. shripad

    जोशी जेव्हा म्हणतात की अनंताला कितीनेही गुणले तरी अनंतच राहते ते तितकेसे बरोबर नाही. शून्याने अनंताला गुणले की काय मिळते? जेव्हा एखाद्या धन (positive) किंवा ऋण (negative) संख्येने आपण (धन) अनंताला गुणतो तेव्हा (धन/ऋण) अनंत मिळेल पण शून्याने गुणल्यावर काय मिळते हे सुस्पष्ट नाही. त्याची व्याख्या गणिताने केलेली नाही.

    smgarge@gmail.com

  2. shripad

    छान लेख आहे, गणितातील किचकट संकल्पना सोप्या करून सांगितल्या आहेत.

Leave a Reply