अनंत काकवा प्रियोळकर

अंक :अभिरुचि, दिपावली १९९४

लेखाबद्दल थोडेसे : अ. का. प्रियोळकर (५ सप्टेंबर १८९७-१३ एप्रिल १९७३) हे इतिहास व भाषा विषयांमधील संशोधक व  लेखक होते. त्यांच्या प्रेरणेनेच मुंबईत मराठी संशोधन मंडळाची स्थापना झाली.  त्यांचा जन्म गोव्यातील प्रियोळ ह्या गावचा. १९२५ साली विविधज्ञानविस्ताराचे काम पाहण्यासाठी ते मुंबईस आले. १९२६ मध्ये मुंबई नगरपालिकेत त्यांनी नोकरी धरली.  १९४८ साली ‘मराठी संशोधन मंडळा’च्या उपसंचालकपदी त्यांची नेमणूक झाली १९५० पासून ते ह्या मंडळाचे संचालक झाले.  या मंडळाद्वारे मराठी संशोधनकार्याला त्यांनी निश्चित स्वरूपाची बैठक दिली आणि गतीही आणली. ग्रंथसंपादनाबरोबरच मौलिक असे इंग्रजी-मराठी ग्रंथलेखनही प्रियोळकरांनी केलेले आहे. द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया (१९५८), गोवा री-डिस्कव्हर्ड (१९६७), द गोवा इंक्विझिशन (१९६१), ग्रांथिक मराठी भाषा आणि कोंकणी बोली (१९६६) हे त्यांचे काही ग्रंथ. कोंकणी ही मराठीहून वेगळी भाषा आहे, हे मत प्रियोळकरांना मान्य नव्हते. कोंकणी-मराठी वादात त्यांनी मराठीचा हिरीरीने पुरस्कार केला. त्यामुळे कोंकणीवादी त्यांचा द्वेष  करत. गोव्यातील ख्रिस्ती आणि हिंदू ह्या दोन समाजांतील भावनात्मक एकात्मता हा त्यांचा ध्यास होता. प्रियोळकरांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख २५ वर्षांपूर्वीचा लेख तुमच्यासाठी पुनश्च…

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 2 Comments

  1. asiatic

    कर्तृत्ववान व्यक्तीवर लिहिलेला लेख, त्यांची दखल घेतली आहे हे विशेष. याशिवाय प्रियोळकरांनी संशोधनपर अनेक कामे केली. डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याप्रमाणेच त्यांनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे अपूर्ण आत्मचरित्र मोठ्या प्रयत्नपूर्वक मिळवून त्याला चरित्राची जोड दिली. मराठी व्याकरण, ग्रंथव्यवहार यासंबंधी अनेक संशोधनपर लेख लिहिले. (वाचकांच्या माहितीसाठी)

  2. mukunddeshpande6958@gmail.com

    छान लेख आहे, माहिती पुर्ण

Leave a Reply